AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: सीरीज आयर्लंड विरुद्ध पण टीम इंडियातील खेळाडूंमध्ये आपसातच ‘सामना’, कारण…

IND vs IRE: उद्यापासून आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. तुलनेने दुबळ्या असलेल्या आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी बीसीसीआयने (BCCI) आपला दुय्यम संघ पाठवला आहे.

IND vs IRE: सीरीज आयर्लंड विरुद्ध पण टीम इंडियातील खेळाडूंमध्ये आपसातच 'सामना', कारण...
Team india
| Updated on: Jun 25, 2022 | 10:42 AM
Share

मुंबई: उद्यापासून आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. तुलनेने दुबळ्या असलेल्या आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी बीसीसीआयने (BCCI) आपला दुय्यम संघ पाठवला आहे. भारताचा अव्वल संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याची तयारी करतोय. त्याचवेळी हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया आयर्लंडला भिडणार आहे. आयर्लंड विरुद्धची ही दोन टी 20 सामन्यांची मालिका कमी महत्त्वाची आहे, असा कोणी समज करुन घेऊ नये. बीसीसीआयच्या निवड समितीचं या मालिकेवर बारीक लक्ष असेल, याचं कारण आहे वर्ल्ड कप. ऑक्टोबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीने बीसीसीआयच्या निवड समितीने आधीपासूनच तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतील, अशा खेळाडूंना हेरण्यावर टीम मॅनेजमेंटच बारीक लक्ष आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका आणि आता आयर्लंड विरुद्धची सीरीज त्यासाठीच महत्त्वाची आहे. आयर्लंड विरुद्धच्या सीरीजसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. काही खेळाडूंसाठी हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यांना वर्ल्ड कपच तिकीटही मिळू शकतं. त्यामुळे या संघातील खेळाडूंची आपल्याच सहकाऱ्यांसोबत स्पर्धा असणार आहे. जाणून घ्या कुठल्या खेळाडूंमध्ये चुरस असेल.

  1. हार्दिक पंड्याने आयपीएल 2022 चे जेतेपद पटकावणाऱ्या गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं. उत्तम कॅप्टनशिपमुळे त्याला आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये कॅप्टन बनवण्यात आलय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये त्यांने चांगली कामगिरी केली होती. आता आयर्लंड विरुद्धही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. टीम मॅनेजमेंटच त्याच्या गोलंदाजीवर लक्ष असेल.
  2. संजू सॅमसनही वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळवू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत जितक्या मॅचमध्ये संधी मिळालीय, त्यात त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे तो आयर्लंड विरुद्ध कशी कामगिरी करतो, ते महत्त्वाचं आहे.
  3. दीपक हुड्डाने आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून दमदार कामगिरी केली. दीपकला संधी मिळाली, तर तो सुद्धा परफॉर्मन्सच्या बळावर वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदार ठरु शकतो.
  4. वेंकटेश अय्यरकडे हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीने सुद्धा हे मान्य केलं होतं. पण हार्दिक पंड्या आपल्या जुन्या फॉर्ममध्ये संघात परतला आहे. त्यामुळे वेंकटेश अय्यरसाठी गोष्टी सोप्या राहिलेल्या नाहीत. त्याला परफॉर्मन्स देऊन स्वत:ला सिद्ध करावं लागेल.
  5. आवेश खानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी 20 मध्ये चार विकेट घेतल्या. पण त्याआधीच तीन सामन्यात तो फेल ठरला. आवेश खानला आयर्लंड विरुद्धच्या छोट्याशा सीरीजमध्ये जबरदस्त कामगिरी करुन दाखवावी लागेल. तरच त्याच्यासाठी संधी निर्माण होऊ शकते.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.