भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने दिली आनंदाची बातमी, पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला दोन जुळी मुलं झाली आहेत. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुलांसोबतचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली.

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने दिली आनंदाची बातमी, पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म
दिनेश कार्तिक आणि त्याच कुटुंब

मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) नुकतीच एक आनंदाची बातमी साऱ्यांना दिली आहे. दिनेश हा बाबा झाला असून त्याच्या पत्नीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दिनेशची पत्नी दीपिका पल्लिकल (Dipika Pallikal) जी भारतासाठी स्क्वॅश हा खेळ खेळते. त्यांच काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतर आता दोघेही आई-बाबा झाले असून विशेष म्हणजे त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

दिनेश कार्तिक हा सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतो. सामन्यांपूर्वीही तो संघात नसला तरी मैदानाची स्थिती विविध खेळाडू किंवा सामन्यांबाबतच मत ट्विट करत असतो. आताही त्याने त्याच्या आयुष्यातील ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर पोहोचवली आहे.

कबीर आणि जियान

दिनेशने सोशल मीडियावर दोन्ही बाळांसोबत पत्नीचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांचा कुत्राही दिसत आहे. त्यामुळे त्याने कॅप्शनमध्ये आम्ही 3 चे 5 झालो असं म्हणलं आहे. त्याने आपल्या दोन्ही मुलांची नावंही सांगितली आहे. त्यांनी दोन्ही मुलांच्या नावांनंतर दोघांची आडनावं लावली आहेत. त्यामुळे एका मुलाचं नाव कबीर पल्लिकल कार्तिक आणि दुसऱ्या मुलाचं नाव जियान पल्लिकल कार्तिक असं आहे. पण फोटो पोस्ट करताना दोन्ही मुलांचे चेहरे दिसणार नाहीत याचीही काळजी दिनेशने घेतली आहे.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 च्या सामन्यांत अवघ्या 5 सेंकदातच कळतं कोण जिंकणार?, भारतीय संघाच न्यूझीलंड विरुद्ध काय होणार?

T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!

India vs pakistan: ‘सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली, म्हणून त्यालाही अटक करणार का?,’ ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल

(Indian Cricketer Dinesh karthik blessed with two baby boys)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI