Video: भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स बालकनीतून गांगुली स्टाईल शर्ट फिरवलं, इंग्लंडला पराभूत करताच जल्लोष
लॉर्ड्सच्या बालकनीत 24 वर्षानंतर पुन्हा भारतीय संघाच्या खेळाडूंनी शर्ट काढून फिरवलं. गांगुलीनंतर पुन्हा असं दृष्य पाहायला मिळालं. इंग्लंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर जल्लोष करण्यात आला.

भारतीय क्रिकेटमधील अनेक अध्याय इतिहासाच्या पानात लिहिले गेले आहेत. यात वर्ष 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्स बालकनीत सौरव गांगुलीने जर्सी काढून फिरवली होती. अँड्र्यू फ्लिंटॉपच्या कृतीला त्याने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आजही हा क्षण माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. असं असताना 24 वर्षानंतर पुन्हा एकदा काहीसं वेगळं पण तशीच कृती भारतीय खेळाडूंकडून लॉर्ड्सच्या बालकनीत पाहायला मिळाली. भारताच्या मिक्स्ड डिसेबिलीटी क्रिकेट संघाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर तसंच सेलीब्रेशन करण्यात आलं.
लॉर्ड्सच्या बालकनीत नेमकं काय घडलं?
डिफरन्टली एबल्ड क्रिकेट काउंसिल ऑफ इंडियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात लॉर्ड्स बालकनीत भारतीय संघाचे खेळाडूंनी आणि सदस्यांनी आपलं शर्ट आणि ब्लेजर काढून ते हवेत फिरवलं. अगदी 2002 मध्ये कर्णधार सौरव गांगुली यांनी फिरवलं होतं तसं… मिक्स्ड डिसेबिलीट क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड आमनेसामने आली होते. 19 ऑगस्टला पार पडलेल्या टी20 सामन्यात भारताने इंग्लंडला 118 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. त्यानंतर भारतीय संघाने उत्साहात सौरव गांगुलीसारखी कृती केली. 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार सौरव गांगुलीने तसं केलं होतं.
When India wins at Lord’s, the celebrations hit different.
A moment of pure cricketing joy on the Lord’s Balcony — coats off, spirits high, and the Tricolour flying with pride.
118 runs. One unforgettable celebration.@imRaviKChauhan@official_idca pic.twitter.com/o6IuoRJto8
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) August 19, 2026
Throwback to Lord’s 2002 Iconic.
That shirt-off celebration from Dada(Saurav Ganguly ) will always be special.
A memory every Indian cricket fan cherishes.#HappyBirthdayDada #SauravGanguly pic.twitter.com/ADPWZqhwp1
— TrueeeCinema🐐 (@TrueeeCinema) July 8, 2026
मालिकेत नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यात सात सामन्यांची मालिका सहा सामन्यानंतर 3-3 अशा स्थितीत होती. त्यामुळे सातवा आणि शेवटचा सामना निर्णायक होता. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या. भारताकडून अर्जुन गावरे यानी 68 धावांची खेळी केली. तर कर्णधार माजिद मागरे याने अवघ्या 19 चेंडूत 63 धावा ठोकल्या. विजयासाठी दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 88 धावांवर सर्वबाद झाला. यात भारताकडून हिलाल अहमद याने 21 धावा देत 4 विकेट काढल्या. तर जयेश परमारने 14 धावांवर तीन विकेट घेतल्या.