IND vs SA ODI Series: रोहित शर्माच्या जागी केएल राहुल कॅप्टन, बुमराह उपकर्णधार, असा आहे भारतीय संघ

दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांसाठी केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

IND vs SA ODI Series: रोहित शर्माच्या जागी केएल राहुल कॅप्टन, बुमराह उपकर्णधार, असा आहे भारतीय संघ
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार प्रदर्शन केलं आहे. फक्त तीन विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. यात राहुलचे नाबाद शतक आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकाचा समावेश आहे. मयांक आणि राहुलच्या खेळीने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने पाया रचला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा केल्या.
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 9:20 PM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 19 ते 23 जानेवारी दरम्यान ही एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. वनडे कॅप्टन रोहित शर्मा अजून दुखापतीमधून सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्याजागी नेतृत्वाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील तीन वनडे सामन्यांसाठी केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Indian Team for south Africa odi series KL Rahul to lead Indias 18-man squad rohit sharma out) 

बुमराह उपकर्णधार

जसप्रीत बुमराहची संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला विश्रांती देण्यात आली आहे. अक्सर पटेल आणि रविंद्र जाडेजा अनफिट आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. टी-20 चे कर्णधारपद सोडणाऱ्या विराट कोहलीला वनडेच्या कॅप्टनपदावरुन हटवण्यात आलं. कारण निवड समितीला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे.

रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत

विराटच्या जागी रोहितची कर्णधारपदी निवड करण्यात आली. पण रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेलाही मुकणार आहे. बंगळुरुत एनसीएमध्ये रोहित फिटनेसवर मेहतन घेण्यासाठी गेला होता. पण अजूनही तो फिट झालेला नाही.

ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यरला संधी

केएल राहुलने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची जोरदार सुरुवात केली आहे. सध्या तो कसोटीचा संघाचा उपकर्णधार आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू वेंकटेश अय्यर यांना वनडे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. नुकत्यात संपलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत दोघांनी दमदार कामगिरी केली होती. गायकवाडने पाच सामन्यात 150.75 च्या सरासरीने 603 धावा केल्या. यात चार शतकांचा समावेश होता. कोहली, पंत आणि बुमराह नऊ महिन्यानंतर वनडे संघात परतले आहेत.

वनडेसाठी भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार,), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यझुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,

संबंधित बातम्या:

दोन खेळाडूंनी मिळून पकडला मॅच जिंकवणारा कॅच, थरारक क्षण पाहणारे प्रेक्षकही अवाक! Quinton de Kock: सेंच्युरियनचा पराभव जिव्हारी लागला, दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.