दोन खेळाडूंनी मिळून पकडला मॅच जिंकवणारा कॅच, थरारक क्षण पाहणारे प्रेक्षकही अवाक!

क्रिकेटमध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे 'Catches Win Matches!'. ही म्हण खरी ठरवणारा एक आश्चर्यकारक झेल न्यूझीलंडमध्ये खेळवल्या जात असलेल्या सुपर स्मॅशमध्ये दोन खेळाडूंनी पकडला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दोन खेळाडूंनी मिळून पकडला मॅच जिंकवणारा कॅच, थरारक क्षण पाहणारे प्रेक्षकही अवाक!
Blake Coburn
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 3:35 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे ‘Catches Wins Matches!’. ही म्हण खरी ठरवणारा एक आश्चर्यकारक झेल न्यूझीलंडमध्ये खेळवल्या जात असलेल्या सुपर स्मॅशमध्ये दोन खेळाडूंनी पकडला. हा झेल थोडा वेगळा होता, पण कमाल होता. मनोरंजक आणि तितकाच आश्चर्यकारक होता. क्रिकेटमध्ये असे झेल क्वचितच पाहायला मिळतात. मिचेल हे आणि ब्लेक कोबर्न ही झेल पकडणाऱ्या खेळाडू जोडीची नावं आहेत. या स्पर्धेतील सामना सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि कँटरबरी यांच्यात खेळवण्यात आला. याच सामन्यात सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सच्या फलंदाजीदरम्यान कँटरबरीच्या या दोन क्षेत्ररक्षकांनी तो अफलातून झेल घेतला. (Blake Coburn, Mitchell Hay took match winning catch in Super Smash)

मिचेल हे आणि ब्लेक कोबर्न या दोघांनी सीमारेषेवर घेतलेला झेल सेंट्रल डिस्ट्रिक्टचा सलामीवीर बेन स्मिथचा होता. या सामन्यात बेन स्फोटक फलंदाजी करत होता. सलामीचा जोडीदार ग्रेग हे हादेखील त्याच्यासोबत दुसऱ्या टोकावरुन आक्रमक फटके खेळत होता. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली. ग्रेग हे 26 धावा करून बाद झाला. पण बेन स्मिथ अजूनही क्रीजवर चिकटला होता. ग्रेग हे बाद झाल्यानंतर केवळ एका षटकानंतर बेन स्मिथचेही काम तमाम झाले. तो टॉड एस्सेलचा बळी ठरला.

दोन खेळाडूंच्या योग्य ताळमेळ आणि अफलातून झेल

बेन स्मिथने 8 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर टॉड एस्सेलवर जोरदार हल्ला चढवला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला. हा चेंडू 6 धावा देऊन गेला असता, मात्र कॅटरबरीचा क्षेत्ररक्षक ब्लेक कोबर्न आडवा आला आणि त्याने बेन स्मिथचे डगआऊटवर परतण्याचे तिकीट कापले. असं काहीतरी घडेल याची कुणालाही कल्पनाही नव्हती. चेंडू सीमारेषेजवळ हवेत असताना ब्लेक कोबर्नने हवेत उडी मारली आणि चेंडू सीमारेषा ओलांडण्याआधीच पकडला आणि नंतर जेव्हा त्याला वाटले की तो चेंडूसकट सीमारेषेच्या पलिकडे पडणार आहे, तेव्हा त्याने चेंडू सीमारेषेच्या आत फेकला, जिथे त्याचा साथीदार मिचेल धावत येत होता. मिचेलने कोणतीही चूक न करता अलगद झेल टीपला आणि बेन स्मिथची विकेट घेण्यात ते यशस्वी ठरले.

या अप्रतिम झेलाचा परिणाम असा झाला की, बेननंतर आलेल्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणाणी हा सामना कँटरबरीने 5 गडी राखून जिंकला.

इतर बातम्या

Quinton de Kock: सेंच्युरियनचा पराभव जिव्हारी लागला, दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले

IND VS SA: नेटमध्ये ते आम्हाला सहकारी समजत नाहीत, सामन्यानंतर केएल राहुलचं वक्तव्य

(Blake Coburn, Mitchell Hay took match winning catch in Super Smash)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.