Indonesia Open 2022: अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला भारतीय खेळाडूनेच दिला पराभवाचा धक्का

इंडोनेशियन ओपन 2022 च्या (Indonesia Open 2022) पहिल्याच राऊंडमध्ये लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला.

Indonesia Open 2022: अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला भारतीय खेळाडूनेच दिला पराभवाचा धक्का
HS Prannoy
Image Credit source: PTI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 15, 2022 | 6:49 PM

मुंबई:इंडोनेशियन ओपन 2022 च्या (Indonesia Open 2022) पहिल्याच राऊंडमध्ये लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का बसला. लक्ष्य सेन जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर आहे. भारताच्याच एचएस प्रणॉयने (HS Prannoy) लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) पराभव केला. या लढतीआधी लक्ष्य सेनने याचवर्षी प्रणॉयचा दोन वेळा पराभव केला होता. पण यावेळी प्रणॉयने बाजी पलटवली. प्रणॉयने 21-10, 21-9 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. लक्ष्य सेन प्रणॉय समोर पूर्णपणे निष्प्रभ ठरला. याचं अनेकांना आश्चर्य वाटलं. कोर्टवर पूर्णपणे प्रणॉयने राज्य केलं. लक्ष्य सेनला प्रणॉयवर कुठलाही दबाव आणता आला नाही. लक्ष्य सेन आणि प्रणॉय थॉमस कप स्पर्धेत एकत्र खेळले होते. ही स्पर्धा जिंकून भारताने इतिहास रचला होता.

प्रणॉय आणि किंदाबी श्रीकांत यांच्यावर भारताची भिस्त

प्रणॉयने रिर्टनचे काही फटके आणि जोरदार स्मॅश मारले. ज्याचं सेनकडे कुठलही उत्तर नव्हतं. अलीकडच्या काही सामन्यांमध्ये लक्ष्य सेनने दमदार कामगिरी केलीय. पण आज त्याचं काहीही चाललं नाही. इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पहिल्यादिवशी साई प्रणीत आणि ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूचं पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आलं होतं. प्रणॉय आणि किंदाबी श्रीकांत यांच्यावर भारताची भिस्त अवलंबून आहे. ते पदक विजेती कामगिरी करु शकतात.

प्रणॉयने मिळवलेला पहिला विजय

आतापर्यंत लक्ष्य सेन आणि प्रणॉयमध्ये तीन सामने झालेत. त्यात आज प्रणॉयने मिळवलेला पहिला विजय आहे. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिलाने विजयाने खातं उघडलं. त्यांच्यापेक्षा क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या जपानी जोडीवर त्यांनी विजय मिळवला. त्यांनी 27-25, 18-25 आणि 21-19 असा विजय मिळवला.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें