INDW vs ENGW : इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे इंडियन वुमन्स टीम फुसsss! दिलं फक्त 80 धावांचं टार्गेट

भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघात दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात महिला संघाने इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर अक्षरश: नांगी टाकली. जेमिमा रॉड्रिग्स सोडली तर एकही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही.

INDW vs ENGW : इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे इंडियन वुमन्स टीम फुसsss! दिलं फक्त 80 धावांचं टार्गेट
INDW vs ENGW : इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय महिला संघाने टाकली नांगी, दिलं फक्त 80 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 8:29 PM

मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघात तीन सामन्यांची टी20 मालिका आहे. या मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे. असं असताना भारतीय महिला संघाने इंग्लंसमोर अक्षरश: नांगी टाकली. एकेरी धावसंख्येवर 8 खेळाडू तंबूत परतले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. जेमिमा रॉड्रिग्स सोडली तर एकही बॅटर चांगली खेळी करू शकला नाही. नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय इंग्लंडने का घेतला असावा हे पहिल्या डावातील धावसंख्येवरून ऐव्हाना लक्षात आलं असेल. टीम इंडियाने सर्व गडी गमवून 80 धावा केल्या आणि विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान इंग्लंडचा महिला संघ सहज गाठेल अशी स्थिती आहे. त्यामुळे आता हा सामना गमावला तर मालिका हातून जाईल.

सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या शफाली वर्माला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी तग धरण्याचा प्रयत्न केला. पण स्मृती मंधाना 10 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर जी रांग लागली तरी थांबलीच नाही. हरमनप्रीत कौर 9, दीप्ती शर्मा 0, रिचा घोष 4, पूजा वस्त्रकार 6, श्रेयंका पाटील 4, जेमिमा रॉड्रिंग्स 30, तितस साधू 8, सायका इशाक 8 अशी धावसंख्या करून बाद झाले. चार्ली डीनने 2, लॉरा बेलने 2, सोफिया एक्ललस्टोनने 2, सारहा ग्लेनने 2, नॅट सायवर ब्रंटने 1 आणि फ्रेया केम्पने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक

इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेथर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेलसोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेथर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.