AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs ENGW : हरमनप्रीत कौरचं दुसऱ्यांदा नशिब निघालं फुटकं, कसोटीतही तसंच झालं Watch Video

भारत आणि इंग्लंड महिला संघात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने ७ गडी गमवून ४१० धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हीनेही चांगली फलंदाजी केली. तिचं अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. रनआऊट होत तिला तंबूत परतावं लागलं. पण तशाच पद्धतीने दुसऱ्यांदा बाद होणं दुर्दैव म्हणावं की योगायोग असा प्रश्न पडला आहे.

INDW vs ENGW : हरमनप्रीत कौरचं दुसऱ्यांदा नशिब निघालं फुटकं, कसोटीतही तसंच झालं Watch Video
INDW vs ENGW : हरमनप्रीत कौर पुन्हा तशीच बाद झाली आणि अर्धशतकं हुकलं, योगायोग की दुर्दैव तुम्हीच ठरवा Watch Video
| Updated on: Dec 14, 2023 | 6:33 PM
Share

मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताची मजबूत पकड दिसून आली. भारताने ७ गडी गमवून ४१० धावा केल्या. आघाडीचे बॅटर्स अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीच्या बॅटर्संनी डाव सावरला. तसेच संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जेमिमा रॉड्रिग्स, शुभा सतीश, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी जबरदस्त खेळी केली. जेमिमा, शुभा, यास्तिका आणि दीप्ती यांनी अर्धशतकी खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौर हीचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. धावचीत होत ती तंबूत परतली. पण ती ज्या पद्धतीने बाद झाली त्याला दुर्दैव म्हणण्याची वेळ क्रीडाप्रेमींवर आली आहे.

टीम इंडियाचे चार जणी बाद झाल्यानंतर यास्तिका भाटिया आणि हरमनप्रीत कौर ही जोडी मैदानात होती. दोघांची चांगली भागीदारी जमली होती. पण दुर्दैवाने हरमनप्रीत कौरला बाद होत तंबूत परतावं लागलं. हरमनप्रीत कौरने ८१ चेंडूत ४९ धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौर स्ट्राईकला होती आणि चार्ली डीनला गोलंदाजी सोपवली होती. पहिल्याच चेंडूवर तिने व्याट उभी असलेल्या पॉइंट्सच्या दिशेने बॉल मारला. सहज एक धाव घेता येईल असं वाटत होतं. पण यास्तिकाने दिला पुन्हा परत पाठवलं आणि नको तीच चूक झाली.

हरमनप्रीत कौरला मागे परतण्यास बराच वेळ होता. पण क्रिसमध्ये पोहोण्यापूर्वीच बॅट अडकली आणि अडखळली. तितक्यात व्याटने फेकलेला बॉल थेट स्टंपला लागला आणि जोरदार अपील करण्यात आली. यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी. कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर हरमनप्रीत कौर बाद असल्याचं निष्पन्न झालं. हरमनप्रीत अशा पद्धतीने दुसऱ्यांदा बाद झाली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशीच बाद झाली होती.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: स्मृति मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह, राजेश्वरी गायकवाड

इंग्लंड: टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, हीथर नाइट (कर्णधार), नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.