AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs IREW : आयर्लंडचा 116 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली

India Women vs Ireland Women 2nd ODI Match Result : वूमन्स टीम इंडियाने सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला. टीम इंडियाने आयर्लंडला 116 धावांनी पराभूत केलं आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.

INDW vs IREW : आयर्लंडचा 116 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली
womens team indiaImage Credit source: bcci women x account
| Updated on: Jan 12, 2025 | 7:08 PM
Share

वूमन्स इंडिया क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने आयर्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. आयर्लंडनेही या आव्हानाच्या प्रत्युत्तरात 250 पार मजल मारत चांगला खेळ दाखवला. मात्र डोंगराएवढ्या आव्हानापुढे आयर्लंडच्या महिला संघाला 50 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 254 धावाच करता आल्या. टीम इंडियाचा यासह 116 धावांनी विजय झाला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली.

आयर्लंडकडून कुल्टर रेली हीने सर्वाधिक धावा रेल्या. कुल्टर रेली हीने 113 बॉलमध्ये 10 फोरसह 80 धावा केल्या. ओपनर सारा फोर्ब्स हीने 38, लॉरा डेलानी हीने 37 आणि लीह पॉल 27 धावा केल्या. तर या व्यतिरिक्त एकीलाही भारतीय गोलंदाजांसमोर 20 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर प्रिया मिश्रा हीने दोघांना बाद केलं. तितास साधू आणि सायली सातघरे या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

दरम्यान टीम इंडियाने त्याआधी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये आपला स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून 370 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्स हीने 91 बॉलमध्ये 102 धावांची शतकी खेळी केली. हर्लीन देओल, कॅप्टन स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या तिघींनी अर्धशतकी खेळी केली. तिघींनी अनुक्रमे 89, 73 आणि 67 धावा केल्या. तसेच आयर्लंडसाठी ओर्ला प्रेंडरगास्ट आणि अर्लीन केली या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जॉर्जिना डेम्पसी हीने एक विकेट घेतली.

महिला ब्रिगेडचा सलग दुसरा विजय

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तितस साधू.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, अलाना डालझेल आणि फ्रेया सार्जेंट.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.