AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 DC vs RCB Live Streaming : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 Delhi Capitals vs Royal Challengers Banglore : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (DC vs RCB) यांच्यातील सामना आज 27 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

IPL 2021 DC vs RCB Live Streaming : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?
DC vs RCB Live Streaming
| Updated on: Apr 27, 2021 | 1:02 PM
Share

अहमदाबाद :  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Delhi Capitals vs Royal Challengers Banglore) या दोन तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार आहे. सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या बंगळुरुला रविवारी चेन्नईने धूळ चारली. 69 धावांनी चेन्नईने विराटसेनेला नमवलं. तर दिल्लीची टीमही चांगलीच फॉर्मात आहे. 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज बंगळुरुला नमवून दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न करेल. तर बंगळुरुचा संघ मागील पराभव विसरुन दिल्लीला धूळ चारण्याचा प्रयत्न करेल. (IPL 2021 Delhi Capitals vs Royal Challengers Banglore When And Where Watch online in Marathi 27th April)

इतिहास काय सांगतो?

दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघांनी आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यातील 4 सामने दोन्ही संघांना जिंकण्यात यश आलंय. आयपीएलच्या पीचवर दिल्ली-बंगळुरु यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळले गेले आहेत. यातील 15 सामने बंगळुरुने जिंकले आहेत तर दिल्लीने 10 सामने जिंकले आहेत.

आज दिल्ली की बंगळुरु, कोण जिंकणार?

चेन्नईकडून पराभूत होण्याअगोदर बंगळुरुने खेळलेले चारही सामने जिंकले होते. पडीक्कल आणि विराट डावाची धमाकेदार सुरुवात करतात तर मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स डावाची उत्तम बांधणी करतात. दिल्लीच्या बाबतीत सलामीवीरांना प्रतिस्पर्ध्यांना घाबरुन असतात. शिखर धवन आणि पृथ्वी शॉचा दमदार परफॉर्मन्स होतो आहे. दिल्लीचे बाकीही खेळाडू उत्तम कामगिरी बजावत आहेत.

सामना कधी आणि कुठे…?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (DC vs RCB) यांच्यातील सामना आज 27 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (DC vs RCB) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सची अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 Delhi Capitals vs Royal Challengers Banglore When And Where Watch online in Marathi 27th April)

हे ही वाचा :

IPL 2021 : कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे, कोडवर्ड्समधून सूचना, पाहा नेमका प्रकार काय?

IPL 2021 : के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो, सोशल मीडियावर फॅन्स कडाडले, म्हणाले, ‘याला पाणी द्यायला ठेवा!’

Video : ख्रिस जॉर्डन नडला, प्रसिद्ध कृष्णा डोळ्यात डोळे घालून भिडला, वाचा मैदानावर नेमकं काय घडलं…?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.