IPL 2021 : ‘त्या’ शेवटच्या ओव्हरची विराटला धास्ती, दिल्लीविरोधात 8 बोलर्स वापरणार?, विराटचा प्लॅन काय?

IPL 2021 Delhi Capitals vs Royals Challengers Banglore : आज रिषभच्या दिल्लीविरोधात विराट 8 गोलंदाज वापरेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

IPL 2021 : 'त्या' शेवटच्या ओव्हरची विराटला धास्ती, दिल्लीविरोधात 8 बोलर्स वापरणार?, विराटचा प्लॅन काय?
विराट कोहली
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 2:05 PM

अहमदाबाद :  आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियवर रोमांचक सामना खेळला जाणार आहे. विराटच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील बंगळुरु (Royals Challengers Banglore) संघ आज रिषभच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्लीशी (Delhi Capitals) दोन हात करणार आहे. एकीकडे पाठीमागील सामन्यात विराटसेनेला चेन्नईने (Chennai Super Kings) पराभवाचं तोंड पाहायला लावलं आहे तर दिल्लीचा संघ पूर्ण फॉर्मात असून बंगळुरुला पाणी पाजण्याचा रिषभचा प्रयत्न असेल. चेन्नईविरोधात खेळताना पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये जाडेजाने 37 धावा ठोकल्या. तसंही बंगळुरुचा बोलिंग अटॅक कमजोर मानला जातो. अशावेळी आज रिषभच्या दिल्लीविरोधात विराट 8 गोलंदाज वापरेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. (IPL 2021 Delhi Capitals vs Royals Challengers Banglore Virat kohli 11 includes 8 bowler against Rishabh Pant DC)

बंगळुरुचे ते 8 गोलंदाज कोण?

चेन्नईविरुद्ध आरसीबीच्या संघात मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, हर्षल पटेल, काईल जेमीसन, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल, असे गोलंदाज होते तर डॅन ख्रिस्टियन आणि ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात दोन अष्टपैलू खेळाडू होते. अशा परिस्थितीत दिल्लीच्या दमदार फलंदाजीला रोखण्यासाठी विराट कोहली हीच प्लेईंग 11 कायम ठेवू शकेल, अशी शक्यता आहे.

दिल्लीची फलंदाजी रोखायची कशी, विराटसमोर मोठा प्रश्न?

दिल्लीची सलामी जोडी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ तुफान फॉर्मात आहेत. दोघेही दिल्लीला शानदार ओपनिंग पार्टनरशीप देत आहेत. त्यातल्या त्यात शिखर धवनचा फॉर्म पाहता त्याला रोखण्यासाठी विराटला खास प्लॅन बनवावा लागेल. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि रिषभ पंतच्या रुपाने दिल्लीची मधली फळीही भक्कम आहे. एकंदरितच दिल्लीची फलंदाजी रोखण्यासाठी बंगळुरुला कसोशीने प्रयत्न करावे लागतील.

बंगळुरुच्या बॅट्समनवर नजर

चेन्नईकडून पराभूत होण्याअगोदर बंगळुरुने खेळलेले चारही सामने जिंकले होते. पडीक्कल आणि विराट डावाची धमाकेदार सुरुवात करतात तर मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स डावाची उत्तम बांधणी करतात.

कोण कुणावर वरचढ ठरणार?

सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या बंगळुरुला रविवारी चेन्नईने धूळ चारली. 69 धावांनी चेन्नईने विराटसेनेला नमवलं. तर दिल्लीची टीमही चांगलीच फॉर्मात आहे. 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज बंगळुरुला नमवून दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न करेल. तर बंगळुरुचा संघ मागील पराभव विसरुन दिल्लीला धूळ चारण्याचा प्रयत्न करेल.

इतिहास काय सांगतो?

दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघांनी आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. यातील 4 सामने दोन्ही संघांना जिंकण्यात यश आलंय. आयपीएलच्या पीचवर दिल्ली-बंगळुरु यांच्यात आतापर्यंत 26 सामने खेळले गेले आहेत. यातील 15 सामने बंगळुरुने जिंकले आहेत तर दिल्लीने 10 सामने जिंकले आहेत.

(IPL 2021 Delhi Capitals vs Royals Challengers Banglore Virat kohli 11 includes 8 bowler against Rishabh Pant DC)

हे ही वाचा :

IPL 2021 DC vs RCB Live Streaming : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे, कोडवर्ड्समधून सूचना, पाहा नेमका प्रकार काय?

IPL 2021 : के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो, सोशल मीडियावर फॅन्स कडाडले, म्हणाले, ‘याला पाणी द्यायला ठेवा!’

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.