IPL 2021 : RCB चा मानहानीकारक पराभव, विराट कोहलीचं काळीज तुटलं, म्हणाला, ‘या मॅचने माझे डोळे उघडले’

संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे. 9 विकेट्सने दमदार विजय मिळवत केकेआरने उर्वरीत पर्वाची दमदार सुरुवात केली आहे.

IPL 2021 : RCB चा मानहानीकारक पराभव, विराट कोहलीचं काळीज तुटलं, म्हणाला, 'या मॅचने माझे डोळे उघडले'
विराट कोहली

दुबई : संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने धुळ चारली आहे. 9 विकेट्सने दमदार विजय मिळवत केकेआरने उर्वरीत पर्वाची दमदार सुरुवात केली आहे. 9 विकेट्सने हरल्यानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला अतिव दुख झालं आहे. या मॅचने माझे डोळे उघडल्याचं तो म्हणाला. तसंच या मॅचमुळे आता इथून पुढच्या मॅचेसमध्ये कोण कुठे कमी पडतोय, याचा अंदाज आला आहे, असंही तो म्हणाला.

अबूधाबीच्या शेख जायद मैदानात सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करत केकेआरने आरसीबीला 92 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि सलामीचा सामना खेळत असलेल्या व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) धमाकेदार फलंदाजी करत 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला.

‘या मॅचने माझे डोळे उघडले’

ही मॅच माझ्यासाठी डोळे उघडणारी होती. संघाला आता कळलं की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अधिक कामाची गरज आहे. आता बाद फेरीच्या अगोदर आमचे 6 सामने उरले आहेत. या 6 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आमच्यापुढे आव्हान असेल.

चांगली भागिदारी करणं महत्त्वाचं होतं. एवढ्या लवकर दव पडेल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. 42 रन्सवर 1 विकेट्स अशा स्कोअरकार्डवरुन पुढच्या 20 रन्समध्ये आमच्या 5 विकेट्सने गेल्या. ही निश्चितच आमच्यासाठी डोळे उघडणारी मॅच होती. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात असा पराभव झाल्यानंतर आता कोणत्या क्षेत्रात (फलंदाजी+क्षेत्ररक्षण) आम्ही कमी पडलो, याचा अंदाज प्रत्येकाला आला असेल. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु, असं विराट कोहली म्हणाला.

आम्हाला आमच्या मजबूत बाजूंवर अधिक लक्ष द्यावे लागेल

“आम्ही आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत, आम्हाला काही सामने गमावण्याची अपेक्षा होती. हा खेळाचा एक भाग आहे, आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन घेण्याची गरज आहे. आम्हाला आमच्या मजबूत बाजूवर अधिक लक्ष द्यावे लागेल आणि आमच्या योजना-रणनिती अंमलात आणाव्या लागतील”, असं विराट म्हणाला.

कोहलीकडून वरुणची स्तुती

पुढील महिन्यापासून होणाऱ्या टी -20 विश्वचषकात कोहलीला भारतीय संघाचे नेतृत्व करायचे आहे. त्याने वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला जो टीम इंडियाचा एक भाग आहे. कोहली म्हणाला, ‘वरुणने खूप चांगली गोलंदाजी केली, जेव्हा तो भारतासाठी अधिकाधिक खेळेल, तेव्हा तो आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू असेल. तो असा खेळाडू आहे ज्याला नजीकच्या भविष्यात भारतासाठी खेळण्याची संधी मिळेल, हे खूप चांगले संकेत आहेत.

आधी आरसीबीला 92 धावांत सर्वबाद केल्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर वेकंटेश अय्यर (नाबाद 41) आणि शुभमन गिल (48) यांच्या जोरावर केकेआरने 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला. यादरम्यान वरुण चक्रवर्तीने दमदार गोलंदजी करत आरसीबीच्या फलंदाजाना जेरीस आणलं. त्याने 4 षटकांत केवळ 13 धावा देत त्याने 3 विकेट्स घेतल्या.

(IPL 2021 KKR vs RCB Virat Kohli says wake up Call For us After RCB Lost By 9 wickets against KKR)

हे ही वाचा :

10 ओव्हरमध्ये मॅच जिंकली, 9 विकेट्सने धुव्वा, विराटची झोप उडवणारे KKR चे RCB विरुद्ध 5 जबरदस्त रेकॉर्ड

IPL 2021: केकेआरचा डॅशिंग विजय, 9 विकेट्सनी सामना घातला खिशात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI