AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : चेन्नई असो की बंगळुरु, जिंकणार म्हणजे जिंकणारच, रोहित शर्माच्या मुंबईचा रेकॉर्ड पाहाच!

आयपीएलचा अर्धवट राहिलेला (IPL 2021) रणसंग्राम येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सर्व संघांनी पुन्हा जोमाने तयारी सुरु केली आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढाई होणार आहे.

IPL 2021 : चेन्नई असो की बंगळुरु, जिंकणार म्हणजे जिंकणारच, रोहित शर्माच्या मुंबईचा रेकॉर्ड पाहाच!
Mumbai Indians
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 16, 2021 | 10:06 AM
Share

दुबई : आयपीएलचा अर्धवट राहिलेला (IPL 2021) रणसंग्राम येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सर्व संघांनी पुन्हा जोमाने तयारी सुरु केली आहे. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिली लढाई होणार आहे. कोरोनामुळे मे महिन्यात जेव्हा स्पर्धा थांबवण्यात आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर होता. तर दुसऱ्या क्रमांकावर धोनीची चेन्नई. मुंबईने प्रत्येक वेळेप्रमाणे संथ सुरुवात केली. पण नंतर पुन्हा अंग झटकून जोश दाखवला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा IPL चा किताब जिंकला आहे. कोणत्या संघाने कोणाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले त्यावर एक नजर –

मुंबई इंडियन्सचा जलवा

आयपीएलचा हा 14 वा हंगाम आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचे नाव सर्वात वर येते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जेव्हाही मैदानात उतरतो, तो केकेआरविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार असतो. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईने 22 सामने जिंकले आहेत. आयपीएलमधील संघाविरुद्ध कोणत्याही संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा हा विक्रम आहे. या दोन संघांमध्ये एकूण 28 सामने झाले आहेत. त्यामुळे केकेआरने केवळ सहा सामने जिंकले आहेत, उरलेले 22 सामने मुंबईने आपल्या नावे केले.

मुंबईचा चेन्नईवर विजय

दुसऱ्या क्रमांकावरही मुंबई इंडियन्सचे नाव आहे. मुंबईने आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 19 सामने जिंकले आहेत. धोनीच्या संघाचा आयपीएलमध्ये आश्चर्यकारक विक्रम असला, तरी रोहित शर्मासमोर चेन्नईचे शेर ढेर होतात. मुंबईने चेन्नईला साखळी फेरीत तर हरवलंच आहे, पण फायनलमध्येही तब्बल तीनवेळा हरवून थेट आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. मुंबई आणि चेन्नईत एकूण 31 सामने झाले आहेत. त्यापैकी 12 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला. मात्र 2019 च्या आयपीएलपूर्वी दोन्ही संघ बरोबरीत होते. पण आयपीएल 2019 मध्ये मुंबईने सलग चार सामने जिंकले आणि आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील गेल्या सात सामन्यांत मुंबईने सहा विजय मिळवले आहेत.

कोलकाताचे किती विजय?

कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम मुंबई इंडियन्सविरुद्ध भलेही चांगला नाही. पण केकेआरचा संघ पंजाब किंग्जविरुद्ध तुफान कामगिरी करतो. प्रीती झिंटाच्या मालकीच्या संघाविरुद्ध केकेआरने 19 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी 28 सामने खेळले. पण पंजाबला केवळ नऊ सामन्यांतच यश मिळवता आले.

म्हणून RCB मागे!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अद्याप आयपीएलचा एकही किताब जिंकू शकलेला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे तगड्या संघांसमोर त्यांचा खराब रेकॉर्ड आहे. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघांनी आतापर्यंत आरसीबीला 17-17 वेळा पराभूत केले आहे.  या संघांनी आरसीबीला जितके पराभूत केले आहे, तितके इतर कोणालाही पराभूत करता आले नाही. मुंबई आणि बंगळुरु 27 वेळा एकमेकांसमोर आले. यामध्ये कोहलीचा संघ केवळ 10 वेळा जिंकू शकला. दुसरीकडे, चेन्नई आणि बंगळुरुमध्ये 28 सामने झाले. यामध्ये आरसीबीला केवळ 9 सामने जिंकता आले.

मुंबईसमोर दिल्लीही झुकली!

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा विक्रमही चांगला आहे. मुंबईने दिल्लीविरुद्ध 16 सामने जिंकले आहेत. यापैकी आयपीएल 2020 मध्ये चार सामने जिंकले होते. गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सने सर्व संघांना पराभूत केले होते. परंतु प्रत्येक वेळी मुंबईकडून पराभूत झाले. दोघेही शेवटचे चार सामने खेळले. या संघांनी 29 वेळा एकमेकांचा सामना केला. पण दिल्लीला मुंबईसमोर 13 वेळा झुकावं लागलं.

चेन्नई विरुद्ध राजस्थान

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध चांगला विक्रम आहे. आयपीएलचा पहिला किताब जिंकणाऱ्या राजस्थानविरुद्ध धोनीच्या यलो आर्मीने अनेक वेळा पराभूत केले आहे. दोन्ही संघ 15 वेळा भिडले आहेत आणि राजस्थानचा 10 वेळा पराभव झाला.

आयपीएलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुणतालिकेचा विचार करता रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 5 सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 10 गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्स (8), राजस्थान रॉयल्स (6), पंजाब किंग्स (6), कोलकाता नाइट रायडर्स (4) आणि सनरायझर्स हैदराबाद (2) हे संघ अनुक्रने चौथ्या ते आठव्या क्रमांकावर आहेत.

 संबंधित बातम्या  

IPL 2021 : रोहित शर्मासमोर धोनी-कोहलीही फेल, मुंबई इंडियन्ससमोर CSK-RCB कितीवेळा हरली?

Follow Us
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!