RR vs CSK : खेळ सुरु होण्याअगोदरच धोनीला पराभवाचा अंदाज आला होता, मॅचनंतर म्हणाला, ‘टॉसवेळीच मला…’

राजस्थानने चेन्नईवर धमाकेदार विजय मिळवला. चेन्नईने 190 धावांचं दिलेलं आव्हान राजस्थानने अगदी सहज पूर्ण केलं. दरम्यान, या पराभवाची भनक धोनीला अगोदरच लागली होती. कारण तशा प्रकारचं वक्तव्यच खुद्द धोनीने केलं आहे.

RR vs CSK : खेळ सुरु होण्याअगोदरच धोनीला पराभवाचा अंदाज आला होता, मॅचनंतर म्हणाला, 'टॉसवेळीच मला...'
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

CSK vs RR : आयीपएल 2021 स्पर्धेत अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 47 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी हा डोंगर अगदी सहजपणे सर केला.  यशस्वी जयसवालची वादळी सुरुवात आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थाने 7 गडी आणि 15 चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण केलं. दरम्यान, या पराभवाची भनक धोनीला अगोदरच लागली होती. कारण तशा प्रकारचं वक्तव्यच खुद्द धोनीने केलं आहे.

चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने वादी शकत ठोकलं. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने 189 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरादाखल राजस्थानचे फलंदाज मैदानात उतरले तेच मुळात ड्रेसिंग रुममधून सेट होऊन… राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि एव्हिन लुईसने वादळी सुरुवात केली. 5.2 षटकांमध्ये दोघांनी 77 धावांची सलामी दिली. त्यानंतर शिवम दुबे आणि संजू सॅमसनेही चांगली खेळी केली आणि नौका विजयापर्यंत पोहोचवली.

या पराभवाचा सीएसकेच्या प्लेऑफ समीकरणावर विशेष परिणाम झाला नाही, सीएसकेचा रन-रेट मात्र थोडा खाली आला आहे. जेव्हा CSK ने राजस्थानला 190 धावांचे लक्ष्य दिले होते, तेव्हा क्वचितच राजस्थानच्या विजयाचा कुणी विचार केला असेल. पण, हा खेळपट्टीचा परिणाम होता… ज्यामुळे राजस्थानच्या फलंदाजांनी स्फोटक फॉर्ममध्ये चेन्नईच्या गोलंदाजांना फोडून काढलं. धोनीला खेळपट्टीचा मूड आधीच कळाला होत. कदाचित म्हणूनच त्याने सामना संपल्यानंतर ‘या सामन्यातील नाणेफेक गमावणं सर्वात वाईट होते’, अशी प्रतिक्रिया दिली.

आम्ही 250 रन्स बनवायला पाहिजे होते

“या पीचवर पहिल्यांदा बॅटिंग करताना आम्ही 250 धावा करायला पाहिजे होत्या. राजस्थानच्या बॅटिंगवेळी पीचवर दव होतं त्यामुळे बॉल बॅटवर चांगल्या प्रकारे येत होता. त्यामुळे राजस्थानच्या फलंदाजांना मोठे फटके खेळणं शक्य झालं. परंतु या बॅटिंगचं क्रेडिट मी पूर्णपणे राजस्थानच्या फलंदाजांना देऊ इच्छितो. सुरुवातीला बॉल थांबून येत होता, स्कीट होत नव्हता”, अशा प्रकारे पीचचे बारकावे धोनीने मॅच संपल्यानंतर सांगितले. तसंच टॉस गमावण्याचे तोटेही सांगितले.

धोनीच्या म्हणण्यानुसार जेव्हा टॉस गमावला त्याचवेळी त्याला पुढील परिस्थितीचा अंदाज आला होता. धोनीने राजस्थानच्या फलंदाजांची मुक्तकंठाने स्तुती केली तसंच चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडच्या खेळीचंही कौतुक केलं.

हे ही वाचा :

RR vs CSK : जयसवालचं वादळ, दुबेची फटकेबाजी, राजस्थानचा चेन्नईवर दिमाखदार विजय, प्लेऑफच्या आशा जिवंत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI