IPL 2021 : आयपीएल स्थगित होताच डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा इमोशनल मेसेज, ‘पप्पा लवकर घरी या, आम्हाला…’

आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या लाडक्या लेकींनी त्याच्यासाठी इमोशनल मेसेज पाठवला आहे. पप्पा लवकर घरी या, असं आर्जव लेकींनी बापाला घातलं आहे. (IPL 2021 Sunrisers Hydrabad David Warner Daughter message Please Daddy Come Home Soon)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:22 AM, 5 May 2021
IPL 2021 : आयपीएल स्थगित होताच डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा इमोशनल मेसेज, 'पप्पा लवकर घरी या, आम्हाला...'
आयपीएल स्थगित झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरच्या लेकीचा इमोशनल मेसेज

मुंबई : देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून वाढला आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना अन कोरोनाच आहे. त्यात काही दिवसांआधी आयपीएलमधील (IPL 2021) बायो बबलमध्येही (Bio Bubble) कोरोना जाऊन पोहचला. खेळाडूंना बाधा झाली. कोरोनाचा वाढता प्रसार आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्पर्धा स्थगित करण्यात आली. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) लाडक्या लेकींनी त्याच्यासाठी इमोशनल मेसेज पाठवला आहे. पप्पा लवकर घरी या, असं आर्जव लेकींनी बापाला घातलं आहे. (IPL 2021 Sunrisers Hydrabad David Warner Daughter message Please Daddy Come Home Soon)

डेव्हिड वॉर्नरच्या लाडक्या लेकींनी त्याच्यासाठी काय मेसेज पाठवलाय…?

भारतात कोरोना व्हायरसचा हाहाकार आणि एकापाठोपाठ एक खेळाडूंना कोरोनाची होत असलेली लागण हे पाहता बीसीसीआयने यंदाचा 14 वा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धा स्थगित होताच डेव्हिड वॉर्नरच्या लाडक्या लेकींनी त्याच्यासाठी इमोशनल मेसेज पाठवलाय. त्याच्या तिन्ही मुलींनी एका स्केचद्वारे त्याने लवकर घरी परतावं, अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच लवकर घरी परतण्यासाठी एक छानसं स्केच काढलं आहे. वॉर्नरने हेच इमोशनल स्केच शेअर केलंय.

“पप्पा लवकर घरी या, आम्हाला तुमची खूप आठवण येतीय, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इवी, इंडी आणि इसलाकडून तुम्हाला खूप खूप प्रेम…” असा इमोशनल मेसेज वॉर्नरच्या लेकींनी त्याच्यासाठी पाठवलाय. आता इतका इमोशनल मेसेज जर पोरींनी बापासाठी पाठवला तर कोणताही बाप हळवा होणारच ना.. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप प्रेम, लव्ह यू, असं म्हणत वॉर्नरने पोरींनी काढलेलं स्केच शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

डेव्हिड वॉर्नरची (Dawid Warner) काही दिवसांपूर्वी सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हकाळपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जागी केन विलियमसनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर वॉर्नरला पुढील सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली नाही. वॉर्नर थेट वॉटरबॉय झालेला दिसून आला. वॉर्नरला वगळल्यामुळे त्याचा तळतळाट लागला आणि आयपीएल स्थगित करण्यात आली, अशा प्रकारचे मिम्स सोशल मीडियावर शेअर होऊ लागले आहेत.

(IPL 2021 Sunrisers Hydrabad David Warner Daughter message Please Daddy Come Home Soon)

हे ही वाचा :

PHOTO | कोरोनाचा क्रीडाक्षेत्राला दणका, IPLसह ‘या’ मोठ्या स्पर्धा स्थगित

IPL 2021 | “वॉर्नरचा तळतळाट लागला”, आयपीएल स्थगितीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

BCCI चे MCA च्या पावलावर पाऊल, मिलिंद नार्वेकरांकडून IPL स्थगितीचे स्वागत