IPL 2022 DC vs RR: वादामुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये दोन गट पडले? शेन वॅटसन यांनी घेतली स्पष्ट भूमिका

IPL 2022 DC vs RR: काल रात्रीच्या सामन्यातील हा वाद चांगलाच गाजला. आता दिल्ली कॅपिटल्स संघातच या वादावरुन दोन गट पडल्याचे दिसत आहे.

IPL 2022 DC vs RR: वादामुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये दोन गट पडले? शेन वॅटसन यांनी घेतली स्पष्ट भूमिका
DC vs RR, Rishabh Pant & Shane watson Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 2:32 PM

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर काल रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (DC vs RR) सामना झाला. या हाय स्कोरिंग मॅचमध्ये मोठ्या प्रमाणात चौकार-षटकार पहायला मिळाले. राजस्थान रॉयल्सने हा सामना 15 धावांनी जिंकला. पण या मॅचमधल्या खेळापेक्षा वादाबद्दलच जास्त चर्चा रंगली आहे. शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर या वादाला सुरुवात झाली. कमरेच्या वर टाकेलला चेंडू नो-बॉल (No ball) द्यावा, अशी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंची मागणी होती. पण मैदानावरील पंच नो-बॉल न देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) खेळाडूंना माघारी बोलवण्यापर्यंत निर्णय घेतला. त्यामुळे काल रात्रीच्या सामन्यातील हा वाद चांगलाच गाजला. आता दिल्ली कॅपिटल्स संघातच या वादावरुन दोन गट पडल्याचे दिसत आहे. “शेवटच्या षटकात जे काही घडलं, त्याचं दिल्ली कॅपिटल्स अजिबात समर्थन करत नाही” असं दिल्लीचे सहाय्यक कोच शेन वॅटसन यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

ओबेड मेकॉय गोलंदाजी करत होता

“खेळाडूंना अंपायरचा निर्णय मान्य करावाच लागला. सामन्या दरम्यान कोणी मैदानात जात असेल, तर ते अजिबात मान्य नाही” असं वॅटसन यांनी सांगितलं. राजस्थान रॉयल्सकडून ओबेड मेकॉय गोलंदाजी करत होता. समोर दिल्ली कॅपिटल्सचा रोव्हमॅन पॉवेल फलंदाजी करत होता. पॉवेलने आपल्या फलंदाजीने हा सामना रोमांचक वळणावर नेऊन ठेवला. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. पण खऱ्या वादाची सुरुवात इथेच झाली.

नॉन स्ट्राइकवर कुलदीप यादव होता

ओबेड मेकॉयने चेंडू टाकला, त्यावेळी नॉन स्ट्राइकवर कुलदीप यादव होता. त्याने चेंडूच्या उंचीवरुन पंचांकडे विचारणा केली. पॉवेलही त्यात सहभागी झाला. ते अंपायरशी बोलत होते. पण मैदानावरील पंच नो-बॉल न देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये येण्याचा इशारा केला. दुसरे सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांनी मैदानात धाव घेतली.

अंपायरचा निर्णय भले मग तो बरोबर असो किंवा….

“शेवटच्या षटकात जे काही घडलं, ते खूप निराशाजनक होतं. शेवच्या षटकात जे काही घडलं, त्याचं दिल्ली कॅपिटल्स समर्थन करत नाही. अंपायरचा निर्णय भले मग तो बरोबर असो किंवा चूक मान्य केलाच पाहिजे. कोणीतरी धावत खेळपट्टीवर जातोय, हे मान्य नाही” असं वॅटसन म्हणाले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.