AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant IPL 2022 DC vs RR: आम्ही खेळणार नाही, No Ball वरुन मैदानात राडा, ऋषभ पंतने खेळाडूंना बोलवलं माघारी, पहा VIDEO

Rishabh Pant IPL 2022 DC vs RR: यंदाच्या सीजनमध्ये पाचव्या विजयाची नोंद केली. हा सामना राजस्थानने जिंकला. पण शेवटच्या षटकात मात्र मैदानावर मोठा ड्रामा पहायला मिळाला.

Rishabh Pant IPL 2022 DC vs RR:  आम्ही खेळणार नाही, No Ball वरुन मैदानात राडा, ऋषभ पंतने खेळाडूंना बोलवलं माघारी, पहा VIDEO
DC vs RR, Rishabh PantImage Credit source: Screengrab
| Updated on: Apr 23, 2022 | 9:04 AM
Share

मुंबई: राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला नमवलं (RR vs DC) व यंदाच्या सीजनमध्ये पाचव्या विजयाची नोंद केली. हा सामना राजस्थानने जिंकला. पण शेवटच्या षटकात मात्र मैदानावर मोठा ड्रामा पहायला मिळाला. अंपायरच्या एका निर्णयावर ऋषभ पंत (Rishabh Pant) इतका नाराज झाला की, खेळाडूंना तो माघारी ड्रेसिंग रुममध्ये बोलवत होता. ऋषभने अंपायर बरोबरच राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर (Jos buttler) बरोबर सुद्धा वाद घातला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचला. शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. रोव्हमॅन पॉवेल स्ट्राइकवर होता. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले. त्यामुळे दिल्लीच्या आशा जिवंत होत्या. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. पण त्यावरुन बराच वाद झाला.

सहाय्यक कोच प्रवीण आमरेंना मैदानात पाठवलं

दिल्ली कॅपिटल्सच्या मते चेंडू कमरेच्या वर होता. त्यामुळे पंचांनी हा नो-बॉल द्यावा, असं त्यांचं मत होतं. स्ट्राइक वर असलेल्या रोव्हमॅन पॉवेलने नो-बॉल का दिला नाही? म्हणून अंपायरकडे विचारणा केली. त्यावेळी पंत डग आउट एरियामध्ये बसला होता. तो आपल्या जागेवरुन उठला व सीमारेषेजवळ येऊन त्याने आपली नाराजी व्यक्त केली. अंपायर आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यावेळी ऋषभ पंत खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये माघारी बोलवलं. त्यानंतर ऋषभने सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांना मैदानात जाऊन पंचांशी बोलायला सांगितलं.

तीन चेंडूत तीन षटकारांची गरज

आमरे लगेच मैदानात गेले. पण पंचांनी त्यांना माघारी पाठवलं. त्यानंतर भडकलेला पंत सर्वात शेवटी जाऊन बसला. या हंगाम्यानंतर दिल्लीला विजयासाठी तीन चेंडूत तीन षटकारांची गरज होती. पण पुढच्या दोन चेंडूंवर फक्त तीन धावा आल्या. शेवटच्या चेंडूवर रोव्हमॅन कॅचआऊट झाला. असाच वाद 2019 मध्ये बघायला मिळाला होता. पंचांच्या निर्णयावर नाराज धोनी डगआउट मधून उठून मैदानात गेला होता. त्याने एका निर्णयावरुन पंचाबरोबर वाद घातला होता.

जोस बटलर बरोबरही वाद

हा सर्व हंगामा सुरु असताना बाउंड्रीवर फिल्डिंग करणारा जोस बटलरही पंत बरोबर चर्चा करत होता. पंत त्याच्याबरोबरही बोलताना चिडलेला दिसत होता. सामना संपल्यानंतर ऋषभने अंपायर बरोबरही चर्चा केली. “तो नो बॉल आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असता. डगआउटमध्ये आम्ही सगळे निराश झालो होतो. तो नो बॉलच होता. थर्ड अंपायरने हस्तक्षेप करुन तो नो बॉल द्यायला पाहिजे होता. मी प्रवीण आमरेना पाठवण चुकीच होतं. पण आमच्याबरोबर जे झालं ते ही चुकीचच होतं” असं सामना संपल्यानंतर पंतने सांगितलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.