IPL 2022 GT vs LSG Live Streaming: गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स Live सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022 GT vs LSG Live Streaming: गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स Live सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
LSG-IPl-2022
Image Credit source: LSG

आयपीएल 2022 (IPL 2022) मधला चौथा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) या दोन नवीन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. सोमवारी (28 मार्च रोजी) हा सामना खेळवला जाईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून गुजरात आणि लखनऊ यांच्यात हा सामना होईल.

अक्षय चोरगे

|

Mar 28, 2022 | 11:38 AM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मधला चौथा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) या दोन नवीन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. सोमवारी (28 मार्च रोजी) हा सामना खेळवला जाईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून गुजरात आणि लखनऊ यांच्यात हा सामना होईल. हे दोन्ही आयपीएलमधले नवीन संघ आहेत आणि आपापला पहिलाच सामना खेळणार आहेत. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. दुसरीकडे, केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. गुजरात टायटन्स हा अहमदाबाद फ्रँचायझीचा संघ आहे. हा संघ CVC Capitals च्या मालकीचा आहे. दुसरीकडे, संजीव गोयंका हे लखनौ फ्रँचायझीचे मालक आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मालकी होती.

हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधार म्हणून दिसणार आहे. या स्पर्धेतील हा त्याचा दुसरा संघ आहे. याआधी तो बराच काळ मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याचबरोबर केएल राहुलने दोन हंगामात पंजाब किंग्जचे कर्णधारपद सांभाळले आहे. लखनौ हा त्याचा चौथा संघ आहे. तो याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचाही भाग होता. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडे काही शानदार खेळाडू आहेत. त्यामुळे या दोन संघांची टक्कर जोरदार होऊ शकते.

GT vs LSG, IPL 2022: गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना लाइव्ह किंवा ऑनलाइन स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येईल?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील IPL-2022 चा चौथा सामना कधी खेळवला जाईल?

IPL-2022 मधला गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना सोमवारी, 28 मार्च रोजी होणार आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील IPL-2022 मधला सामना कुठे खेळवला जाईल?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे, तर पहिला डाव 07.30 वाजता सुरू होईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) कुठे पहता येईल?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना वेगवेगळ्या भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर पाहता येईल.

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पहता येईल?

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामना लाइव्ह स्ट्रीमिंगसह डिस्ने+हॉटस्टारवर ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.

इतर बातम्या

Mumbai Indians च्या Murugan Ashwin ने टिम सायफर्टची दांडी उडवली तो अप्रतिम गुगली चेंडू एकदा पहाच VIDEO

IPL 2022 Mumbai Indians Jasprit Bumrah ला काय झालय? इतकी वाईट बॉलिंग त्याने कशी केली?

Rohit Sharma Fined, IPL 2022: Mumbai Indians ला दुहेरी फटका, रोहितला भरावा लागला 12 लाखाचा दंड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें