AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 LSG vs GT: दुश्मनी विसरुन दीपक हुड्डा-कृणाल पंड्याने परस्परांना मिठी मारली, दोघांमध्ये नेमका वाद काय होता?

IPL 2022 LSG vs GT: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सोमवारी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (LSG vs GT) सामना झाला. आयपीएलमधील नवीन संघ असलेल्या लखनौ-गुजरातचा हा पहिलाच सामना होता.

IPL 2022 LSG vs GT: दुश्मनी विसरुन दीपक हुड्डा-कृणाल पंड्याने परस्परांना मिठी मारली, दोघांमध्ये नेमका वाद काय होता?
कृणाल पंड्या-दीपक हुड्डा Image Credit source: Screengrab
| Updated on: Mar 29, 2022 | 9:36 AM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सोमवारी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (LSG vs GT) सामना झाला. आयपीएलमधील नवीन संघ असलेल्या लखनौ-गुजरातचा हा पहिलाच सामना होता. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. लखनौच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. लखनौचा संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला, त्यावेळी एक वेगळी गोष्ट पहायला मिळाली. गुजरातला पहिल्या षटकात धक्का बसला. स्टार प्लेयर शुभमन गिल (Shubhaman gill) खात उघडण्याआधीच बाद झाला. दुष्मंथा चमीराच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने पॉईंटच्या दिशेने फटका खेळला. पण तिथे उभ्या असलेल्या दीपक हुड्डाने शुभमन गिलचा झेल घेतला.

दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्याचा एक वेगळा इतिहास

पहिल्या षटकात शुभमन गिलसारखी मोठी विकेट मिळाल्यामुळे लखनौ संघ आनंदी होणं स्वाभाविक आहे. पण यावेळी मैदानात एक वेगळी गोष्ट पहाय़ला मिळाली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दीपक हुड्डाने कॅच पकडताच शेजारी उभ्या असलेल्या कृणाल पंड्याने लगेच त्याला मिठी मारली. दोघांनी गळाभेट घेतली. विकेट गेल्यानंतर एकाच टीममधील दोन खेळाडूनी अशा प्रकारने React होणं, स्वाभाविक आहे, असं तुम्ही म्हणाल. पण दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्याचा एक वेगळा इतिहास आहे. कालच्या मॅचमधील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्या आरोपानंतर त्याने बडोद्याची टीम सोडली

कृणाल पंडया आणि दीपक हुड्डा दोघे बडोद्याच्या रणजी संघातून एकत्र खेळायचे. कृणाल कॅप्टन होता तर दीपक उपकर्णधार. पण दोघांमध्ये काही वाद, मतभेद निर्माण झाले. त्याची परिणीत दीपक हुड्डाने बडोद्याचा रणजी संघ सोडण्यामध्ये झाली. बडोद्याकडून खेळताना कृणाल पंड्यावर अपमान केल्याचा आरोप करत दीपक हुड्डा बायो बबलमधून बाहेर पडला होता. कृणालने आपल्याला करीयर संपवण्याची धमकी दिलीय, असा आरोप दीपक हुड्डाने केला होता. त्यानंतर त्याने बडोद्याचा रणजी संघ सोडला होता.

लखनौने दोघांना विकत घेण्यासाठी किती कोटी मोजले?

आता आय़पीएलमध्ये दोघेही लखनौ सुपर जायंट्स टीमचा भाग आहेत. लखनौ टीमने कृणालला आठ कोटी तर दीपक हुड्डाला 5.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्या दोघांनी काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चांगला खेळ दाखवला. संघ संकटात असताना दीपक हुड्डाने अर्धशतकी खेळी केली. 41 चेंडूत 55 धावांची खेळी करताना त्याने सहा चौकार आणि दोन षटकार खेचले. तेच कृणालने 13 चेंडूत नाबाद 21 धावा फटकावल्या. गोलंदाजीमध्येही त्याने चार षटकात 17 धावा देताना भावाचा म्हणजे हार्दिक पंड्याचा महत्त्वाचा विकेट मिळवला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.