MI vs PBKS IPL 2022: टॉसच्या वेळी Rohit sharma झाला कन्फ्यूज, पहा VIDEO

MI vs PBKS IPL 2022: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना सुरु आहे.

MI vs PBKS IPL 2022: टॉसच्या वेळी Rohit sharma झाला कन्फ्यूज, पहा VIDEO
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
Image Credit source: IPL
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 13, 2022 | 8:41 PM

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना सुरु आहे. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टॉसच्यावेळी असं काही घडलं की, रोहित शर्मा सुद्धा कन्फ्यूज झाला. रोहित आणि पंजाब किंग्सचा कॅप्टन मयंक अग्रवाल एकमेकांकडे पाहून हसत राहिले. टॉस जिंकल्यानंतर डॅनी मॉरिसनशी बोलतान रोहित सुरुवातीला हसत होता. पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या विजयासाठी आतुर आहे. टॉस जिंकणं त्यांच्यासाठी फायद्याचा सौदा ठरु शकतो.

टॉसच्या वेळी रोहितने नाणं हवेत उडवलं. पंजाबचा कॅप्टन मयंकने हेड कॉल केला. नाणं जमिनीवर पडल्यानंतर मॅच रेफ्रीने रोहितकडे इशारा केला. त्यावेळी रोहित चेहऱ्यावर हात ठेवून मयंककडे पाहून हसत होता.

मैदानावर प्रेक्षकांचा आवाज असल्यामुळे रोहितच्या ऐकण्यामध्ये कन्फ्यूजन झालं. मयंकने नेमका काय कॉल केला ते त्याला समजलं, नसावं.

टॉस जिंकल्यानंतर रोहित काय म्हणाला?

“मी संघातील खेळाडूंना एवढच सांगितलय की, सकारात्मक रहा, हार मानू नका. ही कठीण परिस्थिती आहे. पण आम्हाला मेहनत करायची आणि सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याची गरज आहे” असं रोहितने सांगितलं.

टॉस जिंकल्यानंतर रोहित म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. आधीसारखाच पीच वाटतोय. आम्ही यावर खेळलो आहोत. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळेल. लक्ष केंद्रीत ठेवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”. असा आहे मुंबईचा संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, बसिल थम्पी,

अशी आहे पंजाब किंग्सची Playing -11 मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंह

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें