AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni Quits CSK Captaincy: असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स

बहुचर्चित आयपीएल (IPL) स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधीच महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडलं. सर्वांनाच हा हैराण करुन सोडणार निर्णय आहे.

MS Dhoni Quits CSK Captaincy: असा आहे धोनीचा IPL ट्रॅक रेकॉर्ड, किती विजय, किती पराभव, जाणून घ्या सर्व डिटेल्स
एमएस धोनी Image Credit source: twitter
| Updated on: Mar 24, 2022 | 4:38 PM
Share

मुंबई: बहुचर्चित आयपीएल (IPL) स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधीच महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच कर्णधारपद सोडलं. सर्वांनाच हा हैराण करुन सोडणार निर्णय आहे. CSK ने टि्वटरवरुन धोनीने कर्णधारपद सोडल्याच्या निर्णयाची माहिती दिली. धोनीच्या जागी रवींद्र जाडेजा आयपीएलचा कॅप्टन झाला आहे. धोनी आयपीएलच्या पहिल्या सीजनपासून चेन्नईचा कॅप्टन आहे. धोनीने या टीमला सहा वेळा चॅम्पियन बनवलं. धोनीने रवींद्र जाडेजाकडे सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली आहे. जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सीएसकचे नेतृत्व करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या टीमला एक ओळख मिळवून दिली. धोनीने CSK मध्ये अनेक क्रिकेटपटूंना घडवलं. जाणून घेऊया धोनीचा कॅप्टन म्हणून रेकॉर्ड.

  1. एमएस धोनीने आयपीएलच्या 204 सामन्यात कर्णधारपद भूषवलं. त्यात 121 सामने चेन्नईने जिंकले, तर 82 सामन्यात पराभव झाला. कॅप्टन म्हणून धोनीच्या विजयाची टक्केवारी 59.60 आहे.
  2. धोनीच्या नेतृत्वाखाली 11 वेळा चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि नऊ वेळा फायनलमध्ये पोहोचला. त्यात चार वेळा आय़पीएलच जेतेपद पटकावलं.
  3. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं. दोन वेळा चॅम्पियन्स लीगमध्येही धोनीने चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं.
  4. चेन्नईच कर्णधारपद सोडल्यानंतर 2007 नंतर पहिल्यांदाच धोनी कॅप्टनशिपशिवाय खेळताना दिसणार आहे.
  5. कॅप्टन म्हणून धोनीने टीम इंडियाला वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवून दिलं.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.