AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, पण Mumbai Indians मुळे तीन संघांचा खेळ बिघडू शकतो, ‘त्या’ तीन टीम्स कुठल्या?

IPL 2022: आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी 10 संघ खेळतायत. गुणतालिकेची स्पर्धा अधिकच इंटरेस्टिंग झाली आहे. दोन पॉइंटस बरोबर नेट रनरेटही तितकाच आवश्यक बनला आहे.

IPL 2022: प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, पण Mumbai Indians मुळे तीन संघांचा खेळ बिघडू शकतो, 'त्या' तीन टीम्स कुठल्या?
mumbai Indians Image Credit source: IPL
| Updated on: May 01, 2022 | 12:57 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांनी शनिवारी सुटकेचा निश्वास सोडला. सलग आठ पराभवानंतर अखेर पहिला विजय मिळवला. मोसमातील पहिला विजय मिळवून रोहित शर्माला (Rohit sharma) काल टीमने बर्थ डे गिफ्ट दिलं. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने (MI vs RR) पाच विकेट राखून विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्सचा संघ आधीच बाहेर गेलाय. फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी अन्य सामन्यात विजय मिळवणं, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आयपीएल लीगमध्ये पहिल्यांदाच कुठलातरी संघ सलग आठ मॅच हरला आहे. मुंबई इंडियन्सची टीम आता उर्वरित सर्व सामने जिंकूनही प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकत नाही. पण असं असलं तरी, ते बाकी संघांचा खेळ मात्र नक्की बिघडवू शकतात.

आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी 10 संघ खेळतायत. गुणतालिकेची स्पर्धा अधिकच इंटरेस्टिंग झाली आहे. दोन पॉइंटस बरोबर नेट रनरेटही तितकाच आवश्यक बनला आहे. मुंबई इंडियन्सचे अजून पाच सामने बाकी आहेत. प्रत्येक सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे दुसऱ्या संघाचा खेळ बिघडू शकतो.

केकेआरचा खेळ मुंबई बिघडवणार?

मुंबई इंडियन्सला आता फक्त पाच सामने खेळायचे आहेत. गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स बरोबर त्यांचे हे सामने होतील. गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचलाय. म्हणजे मुंबई इंडियन्सने त्यांना हरवलं, तरी फार फरक पडणार नाही. त्यानंतरचा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आहे. केकेआरचे नऊ सान्यात सहा गुण झाले आहेत. त्यांचेही अजून पाच सामने बाकी आहेत. अजून एकापराभवामुळे केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाऊ शकतो. सनरायजर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे. आठ सामन्यात त्यांचे 10 गुण झालेत. उर्वरित सहा सामन्यात त्यांना कमीत कमी अजून दोन विजय आवश्यक आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना संधी असेल.

अजून दोन संघांना मुंबई पासून सावध रहाण्याची गरज

मुंबईचा चौथा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहे. त्यांची हालतही मुंबई सारखीच आहे. मुंबईला आतापर्यंत एकंमेव विजय मिळालाय, तर चेन्नईच्या खात्यात चार पॉइंटस आहेत. अजूनपर्यंत चेन्नईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडलेला नाही. पण त्यांच्या पुढे जाण्याची शक्यताही कमी आहे. मुंबई विरुद्धचा पराभव त्यांच्या प्लेऑफच्या अपेक्षांवर पाणी फिरवू शकतो. मुंबईचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्लीची टीम आठ सामन्यात चार मॅच जिंकली आहे. मुंबईकडून दिल्ली पराभूत झाली, तर त्यांच्या प्लेऑफमधील समीकरणावर त्याचा परिणाम होईल. दिल्लीला उर्वरित सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय आवश्यक आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.