AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, सूर्यकुमार यादव सलामीच्या सामन्यात खेळणार नाही?

IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक वाईट बातमी आहे. आयपीएलचा यंदाचा 15 वी सीजन असून स्पर्धा 26 मार्चपासून सुरु होत आहे.

IPL 2022: मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, सूर्यकुमार यादव सलामीच्या सामन्यात खेळणार नाही?
मॅचदरम्यान झालेल्या स्लेजिंगचा किस्सा
| Updated on: Mar 15, 2022 | 2:46 PM
Share

IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एक वाईट बातमी आहे. आयपीएलचा यंदाचा 15 वी सीजन असून स्पर्धा 26 मार्चपासून सुरु होत आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 27 मार्चला होणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधला एक यशस्वी संघ आहे. आतापर्यंत तब्बल पाचवेळा मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा संपूर्णपणे नवीन संघ उतरणार आहे. संघ नवीन असला, तरी मुंबई इंडियन्सकडून अपेक्षा मात्र त्याचं आहेत. मागच्या महिन्यात झालेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction) प्रत्येक टीमने नव्याने संघबांधणी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक नवीन खेळाडू आहेत. सलामीचा सामना जिंकून स्पर्धेत विजयी शुभारंभ करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल, पण त्याआधी मुंबई संघाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा भरवशाचा खेळाडू आहे. पण सलामीच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या सामन्याला तो खेळण्याची शक्यता फार कमी आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून खेळण्याविषयी सस्पेन्स आहे.

सूर्यकुमारच्या खेळण्याबद्दव सस्पेन्स का?

सूर्यकुमार यादव अद्याप दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. हेअरलाइन फ्रॅक्चर झालं होतं. सूर्यकुमार अद्याप त्यातून सावरलेला नाही. त्यामुळे सलामीच्या सामन्यात त्याच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. मेगा ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने एकूण चार खेळाडून रिटेन केले होते. त्यात सूर्यकुमार यादव एक होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सूर्यकुमार श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेलाही मुकला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरीजमध्ये सूर्यकुमारने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं.

BCCI ची मेडीकल टीम काय सल्ला देईल?

“सूर्यकुमार यादव सध्या NCA मध्ये असून तिथे त्याच्या फिटनेसवर काम सुरु आहे. तो रिहॅबच्या प्रोसेसमध्ये आहे. मुंबई इंडियन्सकडून सलामीच्या सामन्यात त्याच्या खेळण्याविषयी साशंकता आहे” अशी बीसीसीआयच्या सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली. BCCI च्या मेडीकल टीमकडून सलामीच्या सामन्यात न खेळण्याचा सल्ला त्याला दिला जाऊ शकतो.

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मधल्याफळीत खेळताना त्याने मुंबईला अनेक सामने जिंकून दिलेत. दूरगामी विचार करता मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापनही त्याच्याबाबतीत धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे.

संबंधित बातम्या: IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट कबड्डीच्या मैदानातच आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या, कोण होते संदीप नंगल अंबिया? अश्विनच्या महानतेवर सवाल उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराला हिटमॅनने गप्प केलं, म्हणाला…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.