IPL 2022 Schedule : वानखेडेवर मुंबई विरुद्ध चेन्नई रणसंग्राम, पाहा Mumbai Indians चं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2022 Schedule : वानखेडेवर मुंबई विरुद्ध चेन्नई रणसंग्राम, पाहा Mumbai Indians चं संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Indians VS Chennai Super Kings
Image Credit source: File

यंदा आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होत असल्याने मुंबई इंडियन्सला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना खूप फायदा होईल, असा सूर इतर फ्रँचायझींमध्ये होता. त्यामुळे काही फ्रँचायझींना असं वाटत होतं की, मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवर आयोजित केले जाऊ नयेत.

अक्षय चोरगे

|

Mar 06, 2022 | 6:32 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 चे वेळापत्रक (IPL 2022 Schedule) जाहीर करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात 26 मार्च रोजी पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आयपीएल 2022 लीगचा (Indian Premier League) शेवटचा सामना 22 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे हे दोन संघ आमनेसामने असतील. यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.

यंदा आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रात होत असल्याने मुंबई इंडियन्सला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळताना खूप फायदा होईल, असा सूर इतर फ्रँचायझींमध्ये होता. त्यामुळे काही फ्रँचायझींना असं वाटत होतं की, मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवर आयोजित केले जाऊ नयेत. अथवा तिथे मुंबईचे सामने कमी असायला हवेत, अशीही मागणी इतर संघांच्या चाहत्यांची होती. त्यानुसार मुंबईचे बहुतांश सामने ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. त्याचबरोबर मुंबईला त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडेच्या मैदानात 4 सामने खेळायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससोबतचा सामनादेखील वानखेडेवर खेळवला जाणार आहे.

मुंबई इंडियन्सचं टाईम टेबल

 1. 27 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम, मुंबई
 2. 2 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30 वाजता) – डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
 3. 6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
 4. 9 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
 5. 13 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
 6. 16 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (दुपारी 3.30 वाजता) – ब्रेबोर्न स्टेडियम, मुंबई
 7. 21 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज – डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
 8. 24 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम, मुंबई
 9. 30 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
 10. 6 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – ब्रेबोर्न स्टेडियम, मुंबई
 11. 9 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
 12. 12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम, मुंबई
 13. 17 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – वानखेडे स्टेडियम, मुंबई
 14. 21 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – वानखेडे स्टेडियम, मुंबई

इतर बातम्या

IND vs SL: क्या बात हैं! मोहालीच्या मैदानात अश्विनची मोठी कामगिरी, दिग्गज भारतीय गोलंदाजाचा विक्रम मोडला

Shane Warne Death: शेन वॉर्नच्या खोलीत पोलिसांना आढळले रक्ताचे डाग, थायलंडला जाण्याआधी डॉक्टरांना का भेटलेला वॉर्न?

IPL 2022 Schedule: आयपीएल 2022 चं शेड्यूल जारी, मुंबईचा पहिला सामना 27 मार्चला, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें