IND vs SL: क्या बात हैं! मोहालीच्या मैदानात अश्विनची मोठी कामगिरी, दिग्गज भारतीय गोलंदाजाचा विक्रम मोडला

IND vs SL: भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Mar 06, 2022 | 4:00 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 06, 2022 | 4:00 PM

भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनने श्रीलंकेविरुद्ध मोहालीमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विनने सामन्याच्या पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या होत्या. फॉलोऑन नंतर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात अश्विनने तीन विकेट घेतल्या.

1 / 5
यासह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा विक्रम मोडला.

2 / 5
अनिल कुंबळे यांनी 132 कसोटी सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. आठवेळा त्याने दहा विकेट घेण्याची किमया साधली आहे. कुंबळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

3 / 5
कपिल देव यांनी 131 कसोटी सामन्यात 434 विकेट घेतल्या. ते नवव्या स्थानावर आहेत. अश्विन आता आठव्या नंबरवर पोहोचला आहे.

4 / 5
मोहालीत पहिल्या डावात दोन विकेट घेऊन अश्विनने न्यूझीलंडचे दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडली यांचा विक्रम मोडला होता. त्यांच्या नावावर 432 विकेट होत्या. अश्विनने 85 कसोटी सामन्यात कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें