IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवर बटलर’राज’ कायम, तुमचा आवडता खेळाडू कोणत्या स्थानी? जाणून घ्या…

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे.

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवर बटलर'राज' कायम, तुमचा आवडता खेळाडू कोणत्या स्थानी? जाणून घ्या...
ऑरेंज कॅपमध्ये पाचव्या स्थानी शुभमन गिल
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 7:32 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल 59 व्या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं (MI) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 14.5 षटकांत 5 बाद 103 धावा करून सामना जिंकला. प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला तर मुंबई इंडियन्स हा या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलाय. आयपीएलचा पंधरावा सीजन अखेरच्या टप्प्यात आला आहे. यासोबतच प्लेऑफची लढत देखील रोमांचक होतं आहे. आता ही शर्यत दहा संघांमध्ये नाही. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरल्यामुळे ही शर्यत आता फक्त सात संघामध्ये आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ आधीच बाहेर होता आणि गुरुवारी या संघाने चेन्नई सुपर किंग्सचं कामही संपवलं. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मंबई आणि चेन्नई आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईनं विजय मिळवत चेन्नईला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढलं. यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया…

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने आतापर्यंत 625 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 459 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर आहे. त्याने 427 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी फाफ डु प्लेसिस असून त्याने 389 धावा काढल्या आहेत. पाचव्या स्थानी शुभमन गिल आहे. त्याने 384 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये केल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

गुजरात संघ पहिल्या क्रमांकावर

मुंबईच्या या विजयाने चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाणऱ्या आशा भंगल्या आहेत. पण, यामुळे गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईचा संघ अजूनही दहाव्या तर चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे 12 सामन्यांत 3 विजय आणि 9 पराभवांसह 6 गुण आहेत. त्याचवेळी चेन्नईचे 12 सामन्यांत 4 विजय आणि 8 पराभवांसह 8 गुण आहेत. गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार असलेला हा संघ 12 सामन्यांत 9 पराभव आणि 3 विजयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्स आहे. ज्यांच्या नावावर 16 गुण आहेत. राजस्थान 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह पाचव्या, सनरायझर्स हैदराबाद 10 गुणांसह सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स दहा गुणांसह सातव्या आणि पंजाब किंग्स अकरा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.