AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: ‘हो, तो CSK वर नाराज, आतमधून खूप दुखावला गेलाय’, अखेर Ravindra Jadeja ची बाजू आली समोर

IPL 2022: दुखापत हे रवींद्र जाडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर पडण्याचं कारण आहे का? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर थेट उत्तर द्यायचं सूत्राने टाळलं. "यावर मला जास्त बोलायचं नाही. हो, त्याला दुखापत झाली आहे. पण ती कितपत गंभीर आहे, याबद्दल मला माहित नाही" असं सूत्राने सांगितलं.

IPL 2022: 'हो, तो CSK वर नाराज, आतमधून खूप दुखावला गेलाय', अखेर Ravindra Jadeja ची बाजू आली समोर
रवींद्र जडेजाImage Credit source: social
| Updated on: May 17, 2022 | 9:16 PM
Share

मुंबई: रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) ज्या पद्धतीने कॅप्टनशिपवरुन पायउतार झाला, त्यानंतर जाडेजा आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये काहीतरी बिनसल्याचं स्पष्ट आहे. रवींद्र जाडेजा कदाचित पुढच्या सीजनमध्ये चेन्नईकडून खेळतानाही दिसणार नाही. आता दुखापतीमुळे तो आयपीएलमधील (IPL) उर्वरित सामने खेळणारच नाहीय. पण सीएसके आणि त्याच्यामध्ये मोठं काहीतरी घडलय. कारण सोशल मीडियावर रवींद्र जाडेजा आणि सीएसकेने परस्परांना आधीच अनफॉलो केलय. जाडेजाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाडेजा CSK च्या मॅनेजमेंटवर नाराज असून तो खूप दुखावला गेलाय. इनसाइट स्पोर्ट्ने हे वृत्त दिलं आहे. “हो, रवींद्र जाडेजा नाराज आहे व दुखावलाही गेलाय. कर्णधारपदाचा विषय अजून चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. खूप घाईघाईत सर्व घडलं. जशा गोष्टी घडल्या, त्यामुळे कुठलाही माणूस दुखावला जाईल” असं, जाडेजाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं.

CSK कडून उत्तर नाही

जाडेजाच्या जवळच्या सूत्रांनी जी माहिती दिली, त्यावर सीएसकेची बाजू ऐकून घेण्यासाठी संघाच्या CEO शी इनसाइड स्पोर्ट्ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर त्यांची बाजू समजली नाही.

जाडेजाला झालेली दुखापत किती गंभीर ते माहित नाही

दुखापत हे रवींद्र जाडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर पडण्याचं कारण आहे का? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर थेट उत्तर द्यायचं सूत्राने टाळलं. “यावर मला जास्त बोलायचं नाही. हो, त्याला दुखापत झाली आहे. पण ती कितपत गंभीर आहे, याबद्दल मला माहित नाही” असं सूत्राने सांगितलं.

आयपीएलचे चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या टीमला यंदाच्या सीजनमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे सीजनच्या मध्यावरच रवींद्र जाडेजाने कॅप्टनशिप सोडली. पुन्हा महेंद्रसिंह धोनीला कॅप्टन बनवण्यात आलं.

जाडेजाची या सीजनमध्ये कामगिरी कशी आहे?

रवींद्र जाडेजाने आपल्या आयपीएल करीयरची सुरुवात राजस्थान रॉयल्समधून केली होती. 2012 च्या लिलावात जाडेजाला सीएसकेने विकत घेतलं. दोन वर्ष चेन्नईची टीम निलंबित असताना तो गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. आयपीएल 2022 मध्ये जाडेजाचं प्रदर्शन चमकदार राहिलेलं नाही. या सीजनमध्ये जाडेजाने 10 सामन्यात फक्त पाच विकेट घेतल्यात तसेच फक्त 116 धावा केल्या आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.