AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी प्रॅक्टिससाठी येणार ठाण्यात, एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

ठाण्यातील (Thane) दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये IPL चं सराव सत्र आयोजित करण्यात आलं आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम हे ठाणे शहरातील सर्वात मोठे क्रीडासंकुल आहे.

IPL 2022: विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी प्रॅक्टिससाठी येणार ठाण्यात, एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
विराट कोहली-एकनाथ शिंदे Image Credit source: File photo
| Updated on: Mar 17, 2022 | 10:07 PM
Share

ठाणे: ठाण्यातील (Thane) दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये IPL चं सराव सत्र आयोजित करण्यात आलं आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम हे ठाणे शहरातील सर्वात मोठे क्रीडासंकुल आहे. यंदा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा मुंबई आणि पुणे शहरात होणार आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर आयपीएलचे सामने होणार आहे. त्याशिवाय पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर आयपीएलचे सामने होतील. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन BCCI ने दोन शहरातच यंदा आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुण्यातील अंतर कमी असल्याने वाहतुकीचा विचार करुन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने होणार आहेत. त्यातील वानखेडेवर 20, ब्रेबॉर्नवर 15, डीवाय पाटीलवर 20 आणि पुण्यातील स्टेडियममध्ये 15 सामने होतील. निवडक चार स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने होणार असले, तरी एकूण 10 संघ आहेत.

‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’च्या स्वागतासाठी ठाणे नगरी सज्ज

या टीम्सच्या सरावासाठी मैदान उपलब्ध करुन देणं देखील तितकच महत्त्वाचं होतं. मुंबई जवळ असलेल्या ठाण्यात आयपीएलमधील एक संघ सरावासाठी येणार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा संघ ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सराव करणार आहे. आयपीएलच्या सराव सत्रासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये विविध सोयी-सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या तयारीचा आढावा घेतला. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ संघाच्या स्वागतासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि ठाणे नगरी सज्ज झाली आहे.

किती दिवस चालणार सराव सत्र?

आयपीएल पूर्व तयारीचे हे सरावसत्र येत्या शुक्रवारपासून ठाण्यात सूरु होणार असून 31 मार्च पर्यंत चालणार आहे. यानंतर एप्रिल महिन्यात पाच दिवस तर मे महिन्यात दोन दिवस ठाण्यात सराव होईल. यानिमित्ताने या संघाचे सदस्य असलेला भारतीय क्रिकेट संघांचा माजी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसी आणि आरसीबीचा स्टार खेळाडू हर्षल पटेल यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू ठाण्यात येऊन सराव करणार आहेत.

तयारीचा घेतला आढावा

या सत्राची सारी सज्जता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली असून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे जंगी स्वागत ठाण्यात करण्यात येणार आहे. या सरावसासाठी खास तयार करण्यात आलेले ग्राउंड सज्ज ठवणे, जिम सुसज्ज ठेवणे, स्टेडियममध्ये आतील आणि बाहेरील बाजूस करायचे ब्रँडिंग तसेच खेळाडूंच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेली पेव्हॅलीयन, ड्रेसिंग रूम येथे करण्यात आलेल्या तयारीचा आढावा मंत्री शिंदे यांनी घेतला. तसेच काही ठिकाणी अपेक्षित असलेले बदल सुचवले.

येण्या-जाण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर

हा संघ ठाण्यात सराव करणार असला तरीही बीसीसीआयच्या नियमावलीनुसार खेळाडू बायोबबलमध्ये असतील. तसेच त्यांच्या येण्या-जाण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करून देण्याचा सूचना देखील पोलीस आणि वाहतूक विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. यानिमित्ताने खेळाडूंच्या स्वागतासाठी स्टेडियम बाहेरील भिंत सुशोभित करण्यात आलेली असून, शहरात जागोजागी फलकही लावण्यात येणार आहेत.

यावेळी खास माध्यमकर्मीनी आग्रह केल्यामुळे मंत्री शिंदे यांनी हातात बॅट घेऊन पीचला कोणताही अपाय न होऊ देता काही शॉट्स मारले. हे सगळेच शॉट्स त्यांच्या सरळ स्वभावानुसारच स्ट्रेट शॉट्स होते. स्टेडियमच्या आतील काम पाहिल्यावर त्यांनी स्टेडियम बाहेरील परिसराची देखील पाहणी केली. त्यासोबतच स्टेडियमच्या बाहेर तयार करण्यात आलेल्या शूटिंग रेंजला भेट देऊन हातात बंदूक घेऊन समोरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे,उपायुक्त संजय हेरवाडे, दुसरे उपायुक्त मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त अशोक बुरपुले, क्रीडा अधिकारी अश्विनी पालांडे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एपेकस कमिटीचे सदस्य नदीम मेमन, लाईट अँड शेड्सचे संचालक संदीप वेंगुर्लेकर उपस्थित होते.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.