IPL 2022 RCB: ‘विराट आता जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिला नाही’ RCB चा मोठा खेळाडू कोहलीबद्दल हे काय म्हणाला?

IPL चा 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट पंडित आणि मीडियाचं जास्त लक्ष असेल.

IPL 2022 RCB:  'विराट आता जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिला नाही' RCB चा मोठा खेळाडू कोहलीबद्दल हे काय म्हणाला?
IPL 2022 - RCB विराट कोहली Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 6:51 PM

नवी दिल्ली: IPL चा 15 वा सीजन सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. सर्वच संघांची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कामगिरीवर क्रिकेट पंडित आणि मीडियाचं जास्त लक्ष असेल. कारण अलीकडच्या काही मालिकांमध्ये विराट कोहलीला (Virat kohli) अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. विराटच्या बॅटमधून जणू धावा आटल्या आहेत. आयपीएलमध्ये विराटला सूर गवसतो का? याकडे माध्यमांचे लक्ष असणार आहे. विराट कोहलीकडे आता कर्णधारपदाची जबाबदारी नाहीय. त्यामुळे मुक्तपणे खेळ करण्यास त्याला वाव आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध विराट शेवटचा T-20 सामना खेळला होता. त्यावेळी त्याने आक्रमक खेळ केला होता. आगामी आयपीएलच्या सीजनमध्येही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे.

कॅप्टनशिपची जबाबदारी नसल्यामुळे विराट कोहली सध्या तणावमुक्त आहे. टेन्शन फ्री कोहली प्रतिस्पर्धी संघांसाठी जास्त धोकादायक ठरु शकतो, असं मत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने व्यक्त केलं. विराट कोहलीने मागच्यावर्षी RCB चं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याने भारतीय संघाची टी 20 कॅप्टनशिपही सोडली.

विराट आता आक्रमक राहिलेला नाही

“विराट कोहलीमध्ये आता पहिल्या सारखी आक्रमकता राहिलेली नाही. विराट कोहली आता मैदानावर जशास तसं उत्तर देणारा क्रिकेटपटू राहिलेला नाही” असं मॅक्सवेलने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. त्याचं हे वक्तव्य RCB आणि विराटच्या चाहत्यांना कितपत पटेल? याबद्दल थोडी साशंकता आहे.

तो त्या दबावाखाली होता

BCCI ला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कॅप्टन नको होते. त्यामुळे त्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. “विराट कोहलीवर कॅप्टनशिपची जबाबदारी होती. तो त्या ओझ्याखाली होता. आता तो त्या जबाबदारीतून मुक्त झालाय प्रतिस्पर्धी संघांसाठी तो आता जास्त धोकादायक ठरु शकतो” असे मॅक्सवेल RCB च्या पॉडकास्टमध्ये म्हणाला. कॅप्टनशिपचा दबाव नसल्यामुळे कोहली पुढची काहीवर्ष मुक्तपणे क्रिकेट खेळण्याचा आनंद घेऊ शकतो असं मॅक्सवेलने म्हटलं आहे.

फाफ डू प्लेसिस RCB चा कॅप्टन RCB ने कॅप्टनशिपची जबाबदारी आता दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसकडे दिली आहे. त्याचं मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकच नाव RCB च्या कॅप्टनशिपसाठी आघाडीवर होतं. पण टीम मॅनेजमेंटने डू प्लेसिसवर विश्वास दाखवला. फाफ डू प्लेसिस चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायचा. त्याने CSK कडून खेळताना सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं आहे.

Non Stop LIVE Update
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.