DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO

DC vs RCB IPL 2022: यंदाच्या IPL मध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) अद्याप आपली छाप उमटवता आलेली नाहीय. आयपीएल सुरु होण्याआधीपासून विराटचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता.

DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO
विराट कोहली रनआऊट Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:18 PM

मुंबई: यंदाच्या IPL मध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) अद्याप आपली छाप उमटवता आलेली नाहीय. आयपीएल सुरु होण्याआधीपासून विराटचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता. अद्यापही त्याला सूर गवसलेला नाही. विराटकडे आता कॅप्टनशिपची जबाबदारी नाहीय. त्यामुळे तो दबाव मुक्त होऊन खेळेल. त्याची फलंदाजी अधिक बहरेल, या नुसत्या चर्चाच ठरल्या आहेत. कारण कॅप्टनशिपची ओझं नसलं, तरी विराटच्या खेळात ती मॅच विनिंगची इच्छाशक्ती दिसलेली नाही. तो यंदाच्या सीजनमध्ये मोठी खेळी करु शकलेला नाही. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला फार काही करत आलं नव्हतं. विराटच्या बॅटमधून धावा निघत नसताना, नशीबही त्याला साथ देत नाही. विराटचं रनिंग बिटविन द विकेट खूपच चांगलं आहे. एकेरी-दुहेरी धावा पळून काढण्यात तो माहीर आहे.

याच सवयीमुळे विकेट

वेगाने पळण्यासाठी प्रसिद्ध असलेला कोहली याच सवयीमुळे आयपीएलमध्ये आज दुसऱ्यांदा धावबाद झाला. यंदाच्या सीजनमध्ये सहा सामन्यात रनआऊट होण्याची त्याची दुसरी वेळ आहे. आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात कोहली ललित यादवच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे रन आऊट झाला.

कोहली-मॅक्सवेलवर डाव संभाळण्याची जबाबदारी

आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीची टीम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. त्यांची चांगली सुरुवात झाली नाही. तीन षटकांच्या आतच कॅप्टन डु प्लेसिस आणि अनुज रावत ही सलामीवीरांची जोडी पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर डाव संभाळण्याची जबाबदारी कोहली आणि मॅक्सवेलवर आली. दोघांनी सावध फलंदाजी सुरु केली. दोघांमध्ये चांगली भागीदारी होईल असं वाटत होतं. पण सातव्या षटकात घात झाला.

डाइव्ह मारुन एका हाताने थ्रो

शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीवीर अनुज रावतला पायचीत पकडलं. त्याने टिच्चून गोलंदाजी केली. त्यामुळे विराटला सहजतेने धावा करता आल्या नाहीत. पहिल्या चेंडूवर रन घेता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कोहलीने शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने हलकासा फटका खेळला. कोहली धाव घेण्यासाठी पळाला. पण मॅक्सवेलने थोडं पुढे आल्यानंतर त्याला माघारी परतायला सांगितलं. त्याचवेळी बॅकवर्ड पॉइंटवरुन वेगाने येत ललित यादवने चेंडू उचलला. डाइव्ह मारुन एका हाताने केलेला थ्रो थेट स्टम्पवर आदळला. कोहली वेळेत क्रीझमध्ये पोहचू शकला नाही. त्यामुळे तो रनआऊट झाला. विराट 14 चेंडूत 12 धावा करुन तंबूत परतला.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.