AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Auction आधी कुठल्या टीमकडे खरेदीसाठी किती पैसा शिल्लक आहे? जाणून घ्या डिटेल्स

IPL 2023 Auction मध्ये सर्वाधिक पैसा कुठली टीम खर्च करु शकते? जाणून घ्या.

IPL 2023 Auction आधी कुठल्या टीमकडे खरेदीसाठी किती पैसा शिल्लक आहे? जाणून घ्या डिटेल्स
ipl 2023
| Updated on: Dec 20, 2022 | 7:29 PM
Share

IPL 2023 Auction Players Final List: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या पुढच्या सीजनसाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये होईल. आयपीएल 2023 सीजनसाठी खेळाडूंची लिलावाची यादी समोर आलीय. 15 नोव्हेंबरला आयपीएल टीम्सनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची लिस्ट BCCI ला सोपवली होती. या ऑक्शनआधी सर्व टीम्सच्या स्क्वाॉडबद्दल जाणून घ्या. कुठल्या टीमकडे ऑक्शनसाठी किती पैसा शिल्लक आहे.

1. Mumbai Indians Team:

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील यशस्वी संघ आहे. ते ऑक्शनमध्ये 20.55 कोटी रुपयाच्या रक्केमसह उतरणार आहेत. मुंबई इंडियन्सची नजर या ऑक्शनमध्ये वेगवान गोलंदाज आणि ऑलराऊंडर्सवर असेल.

रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा (कॅप्टन), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, टिम डेविड, रमनदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडोर्फ, आकाश माधवली.

2. Gujarat Titans Team:

आयपीएल 2022 ची चॅम्पियन टीम गुजरात टायटन्सकडे 19.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. गुजरात टायटन्सने एकूण 5 खेळाडूंना रिलीज केलय.

रिटेन केलेले खेळाडू

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुभमन गिल, साई सुदर्शन, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकांडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद

3. Chennai Super Kings Team:

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडे 20.45 कोटी रुपये बाकी आहेत. त्यांची नजर ऑलराऊंडर्सवर असेल.

रिटेन केलेले खेळाडू

एमएस धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, अंबाती रायुडू, डेवोन कॉन्वे, सुभ्रांशु सेनापति, मोइन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सैंटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे,दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा

4. Lucknow Super Giants Team:

लखनौ सुपर जायंट्स 23.35 कोटी रुपयासह ऑक्शनमध्ये उतरेल. अनेक मोठ्या खेळाडूंवर ते बोली लावू शकतात.

रिटेन केलेले खेळाडू

केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, करण शर्मा, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, काइल मेयर्स, कुणाल पांड्या, आवेश खान, मोहसिन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवि बिश्नोई

5. Delhi Capitals Team:

युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडे 19.45 कोटी रुपये बाकी आहेत.

रिटेन केलेले खेळाडू

ऋषभ पंत (कॅप्टन), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, सर्फराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नोर्त्जे, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल.

6. Royal Challengers Bangalore:

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने यावेळी फक्त 5 खेळाडूंना रिलीज केलं. 8.75 कोटी रुपयांसह ते ऑक्शनमध्ये उतरतील.

रिटेन केलेले खेळाडू

फाफ डुप्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

7. Punjab Kings Team:

पंजाब किंग्स नव्या कॅप्टनसह आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये उतरणार आहे. पंजाब किंग्सकडे सध्या 32.2 कोटी रुपये बाकी आहेत. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात बोली लावतील.

रिटेन केलेले खेळाडू

शिखर धवन (कॅप्टन), शाहरुख खान, जॉनी बेयरस्टो, प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषि धवन, लियम लिविंगस्टोन, अथर्व ताएदे, अर्शदीप सिंह, बलतेज सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा, राहुल चाहर , हरप्रीत बराड़,

8. Kolkata Knight Riders

कोलकाता नाइट रायडर्स टीमकडे 7.05 कोटी रुपये बाकी आहेत. ते या ऑक्शनमध्ये कदाचितच मोठी बोली लावतील.

रिटेन केलेले खेळाडू

श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, रहमनुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, टिम साउदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंह.

9. Rajasthan Royals Team:

राजस्थान रॉयल्स टीमकडे सध्या 13.2 कोटी रुपये बाकी आहेत. मागच्या सीजनमध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं.

रिटेन केलेले खेळाडू

संजू सॅमसन (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडीक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मैक्कॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल , केसी करिअप्पा.

10. Sunrisers Hyderabad Team:

सनरायजर्स हैदराबादची टीम या ऑक्शनमध्ये सर्वाधिक रक्कम खर्च करताना दिसेल. त्यांच्याकडे 42.25 कोटी रुपये बाकी आहेत. सनरायजर्स हैदराबादची टीम खेळाडूंना मालामाल करु शकते.

रिटेन केलेले खेळाडू

राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, एडेन मार्करम, मार्को जॅनसन, वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.