AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Old is Gold | सुनील नरेन याच्या या दोन विकेट्सने चेन्नईचा झाला पराभव, पाहा व्हिडीओ

आजच्या विजयामध्ये केकेआरसाठी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे सुनील अनुभवी फिरकीपटू सुनील नरेन याने घेतलेल्या महत्त्वपूर्ण दोन विकेट्स. 

IPL 2023 : Old is Gold | सुनील नरेन याच्या या दोन विकेट्सने चेन्नईचा झाला पराभव, पाहा व्हिडीओ
| Updated on: May 15, 2023 | 12:19 AM
Share

मुंबई :  चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कोलकाता नाईट रायडर्स संघाने 6 विकेट्सने पराभव करत ट्विस्ट आणला आहे. सर्वांना वाटलं की सीएसकेचा संघ केकेआरला पराभूत करून प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करेल. मात्र असं काही झालं नाही. केकेआरने सांघिक कामगिरी करत बलाढ्य सीएसकेसारख्या संघावर मात केली. आजच्या विजयामध्ये केकेआरसाठी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे सुनील अनुभवी फिरकीपटू सुनील नरेन याने घेतलेल्या महत्त्वपूर्ण दोन विकेट्स.

सामन्याचा टर्निंग पॉइंट 

सीएसकेच्या 3 विकेट्स गेल्या होत्या आणि मैदानात अंबाती रायुडू आणि मोईन अली मैदानात होते. सीएसकेच्या 10 ओव्हरमध्ये 68-3 विकेट्स होत्या. एका चांगल्या भागीदाराची चेन्नईला गरज होती. परंतू ओव्हरमधील पहिल्या बॉलवर नरेनने  अंबाती रायडूला आणि त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर मोईन अली  यांना बोल्ड करत सीएसकेला बॅकफूटवर ढकललं.

पाहा व्हिडीओ- 

सीएसकेची  या विकेट्सनंतर मोठी भागीदारी झाली नाही. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांना कमाल केली. त्यानंतर सीएसकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 विकेट्स गेल्या होत्या. सामना दोन्ही बाजूला झुकलेला होता मात्र रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी विजयी भागीदारीच केली. 2 धावांची गरज असतान नितीश राणाने चौकार मारत विजयावर शिक्कमोर्तब केलं.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.