IPL 2023, MI | मुंबई इंडियन्स टीममध्ये जसप्रीत बुमराह याच्या जागी घातक गोलंदाजाची एन्ट्री

जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे आयपीएलच्या 16 व्या मोसमात खेळता येणार नाही. त्यामुळे बुमराहच्या जागी त्याच्या इतक्याच घातक गोलंदाजाचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला आहे.

IPL 2023, MI | मुंबई इंडियन्स टीममध्ये जसप्रीत बुमराह याच्या जागी घातक गोलंदाजाची एन्ट्री
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 5:07 PM

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील सलामीचा सामना हा आज (31 मार्च) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्स टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पलटणच्या गोटात दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह याच्या जागी बदली खेळाडूची एन्ट्री झाली आहे. बुमराह याला गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 आणि त्यानंतर झालेल्या प्रत्यके सीरिजला मुकावं लागलं. त्यानंतर तो आयपीएलच्या 16 व्या हंगामापर्यंत फीट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दुखापतीमुळे बुमराहला इथेही खेळता येणार नाही. मात्र बुमराहची दुखापतही युवा गोलंदाजाच्या पथ्यावर पडली आहे. अवघे काही तास शिल्लक असताना या गोलंदाजाचा पलटणमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या खेळाडूचा समावेश

बुमराहच्या जागी टीम इंडियाचा संदीप वॉरियर याला संधी देण्यात आली आहे. संदीपचा 50 लाख रुपये मोजून त्याचा पलटणमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएल मॅनेजमेंटने ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. संदीपने टीम इंडियाकडून श्रीलंका विरुद्ध 2021 मध्ये एकमेव टी 20 मॅच खेळली आहे. संदीने याआधी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलं आहे.

हे सुद्धा वाचा

संदीप वॉरियर याला संधी

मुंबईचा पहिला सामना केव्हा?

मुंबई या मोसमातील आपला सलामीचा सामना हा बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

आयपीएल इतिहासातील यशस्वी टीम

मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण 15 मोसमांपैकी 5 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा एकूण 5 पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत.

‘हिटमॅन’ची हिट कामगिरी

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेतील यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आहे. रोहित 2013 पासून म्हणजेच गेल्या 8 मोसमांपासून मुंबईचे नेतृत्व करतोय. यामध्ये त्याने मुंबईला 8 पैकी 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. रोहित कॅपटन्सीसोबत एक अफलातून फलंदाजदेखील आहे.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.