AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs LSG IPL 2023 : रवि बिश्नोईची एक चूक लखनऊ सुपर जायंट्सला पडणार महागात, काय केलं वाचा

आयपीएल 2023 प्लेऑफसाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना प्लेऑफसाठी महत्त्वाचा आहे. पण या महत्त्वपूर्ण सामन्यात रवि बिश्नोईने चूक केली.

MI vs LSG IPL 2023 : रवि बिश्नोईची एक चूक लखनऊ सुपर जायंट्सला पडणार महागात, काय केलं वाचा
MI vs LSG IPL 2023 : महत्त्वाच्या सामन्यात रवि बिश्नोईची मोठी चूक, लखनऊचं स्वप्न भंगणार!
| Updated on: May 16, 2023 | 10:40 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात महत्त्वाचा सामना सुरु आहे. या सामन्यातील प्रत्येक चूक संघाला चांगलीच महागात पडणार आहे. अशीच चूक रोहित शर्माचा झेल सोडून रवि बिश्नोईने केली. लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकात 3 गडी गमवून 177 धावा केल्या. लखनऊ समोर विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान लखनऊच्या मैदानावर पाहिलं तर मोठं आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि इशान किशनने सावध सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी चांगली भागीदारी केली. एक क्षण असा आला की रोहित शर्मा आऊट असंच सर्वांना वाटलं. पण त्या चेंडूवर सिक्स गेला.

पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने यश ठाकुरला पुल शॉट मारला. हा चेंडू रवि विश्नोईच्या हातात बसला. पण सिक्सवर तोल गेल्याने तो सीमारेषेवर पडला. त्यामुळे आऊट होण्याऐवजी सिक्स गेला. यामुळे लखनऊच्या डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंनी डोक्यावर हात मारला. हा षटकार कदाचित शेवटच्या षटकात महागात पडू शकतो.

रोहित शर्मा मोठी खेळी करेल असं वाटत असताना रवि बिश्नोईच्या गोलंदाजीवर विकेट टाकली. लाँग ऑनवर रोहित शर्माने उत्तुंग फटका मारला.  तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या दीपक हुड्डाने झेल घेतला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.