IPL 2023 : 5 नवीन नियम आयपीएल 2023 चा रोमांच वाढवणार, सर्वात क्रांतीकारी बदल Playing- 11 संदर्भात

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियम. यंदाच्या आयपीएलमध्ये तुम्हाला नवीन नियम दिसतील. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. तेव्हापासून हे नियम लागू होतील.

IPL 2023 : 5 नवीन नियम आयपीएल 2023 चा रोमांच वाढवणार, सर्वात क्रांतीकारी बदल Playing- 11 संदर्भात
CSK
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:42 AM

IPL 2023 : IPL 2023 च्या 16 व्या सीजनला आता आठवड्याभराचा अवधी उरला आहे. दरवर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठा उत्साह असतो. या सीजनमध्ये ‘होम-अवे’ फॉर्मेट असणार आहे. म्हणजे यंदा सर्वच टीम आपलं होम ग्राऊंड आणि दुसऱ्या टीम्सच्या मैदानावर खेळणार आहेत. कोरोनाव्हायरसमुळे मागची तीन वर्ष ठराविक ग्राऊंडसवरच सामने झाले. यंदाच्या आयपीएलच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नियम. यंदाच्या आयपीएलमध्ये तुम्हाला नवीन नियम दिसतील. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. तेव्हापासून हे नियम लागू होतील.

आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्या आणि चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनी मैदानात उतरतील. यंदाच्या सीजनमध्ये कुठले नवीन नियम असणार त्या बद्दल जाणून घ्या.

प्लेइंग इलेव्हनची घोषणा

सर्वात क्रांतीकारी बदल प्लेइंग इलेव्हनच्या घोषणे संदर्भात आहे. आतापर्यंत कॅप्टन टॉसच्यावेळी प्लेइंग इलेव्हनची माहिती द्यायचे. पण आता काही बदल झालेत. आता कॅप्टन टॉसच्यावेळी दोन प्लेइंग इलेव्हन ठेऊ शकतो. प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना कॅप्टनकडे दोनपैकी एक प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा पर्याय असेल. टॉसचा परिणाम कमी करण्यासाठी हा नियम बनवण्यात आलाय. फक्त टॉस जिंकणाऱ्या टीमला फायदा होऊ नये, हा त्यामागे उद्देश आहे.

इम्पॅक्ट प्लेयर

संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरतील. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी सांगावी लागतील. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागणार आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर सामन्याच्या सुरुवातीपासून करता येईल. टीम, वाटल्यास शेवटच्या काही ओव्हरसाठी त्याचा वापर करू शकते. विकेट पडल्यानंतर किंवा बॅटर रिटारर्ड हर्ट झाला की खेळाडू मैदानात उतरू शकतो.

पण विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर गोलंदाजी असणाऱ्या संघाने इम्पॅक्ट प्लेयर आणाला तर तो आधीचं षटक पूर्ण करू शकणार नाही. त्याला पुढच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

अजून कुठले नवीन नियम आहेत?

WPL प्रमाणे आयपीएलमध्येही खेळाडूंना नोबॉल आणि वाइड बॉलवर DRS घेण्याचा पर्याय असेल. WPL मध्ये पहिल्यांदा या नियमाचा प्रयोग करण्यात आला. या नियमांमुळे अंपायरच्या चूका अजून कमी होतील.

टीम्सनी निर्धारित वेळेत आपल्या ओव्हर्सचा कोटा पूर्ण केला नाही, तर उर्वरित ओव्हर्ससाठी 30 यार्ड बाहेर फक्त 4 फिल्डर्स ठेवता येतील. विकेटकीपर किंवा फिल्डरने आपल्या पोजिशनमध्ये उगाचच बदल केला, तर त्याला चुकीच मानून फलंदाजी करणाऱ्या टीमला 5 रन्स बहाल केले जातील. त्याशिवाय तो चेंडू डेड बॉल ठरवला जाईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.