AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Qualifier 1 GT vs CSK Live Streaming | फायनलमध्ये डायरेक्ट एन्ट्रीसाठी गुजरात विरुद्ध चेन्नई आमनेसामने

Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Streaming | गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या टीम क्वालिफायर 1 मॅचमध्ये आमनेसामने आहेत. ही मॅच जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये पोहचणार आहे.

IPL 2023 Qualifier 1 GT vs CSK Live Streaming | फायनलमध्ये डायरेक्ट एन्ट्रीसाठी गुजरात विरुद्ध चेन्नई आमनेसामने
| Updated on: May 22, 2023 | 10:34 PM
Share

तामिळनाडू | आयपीएल 2023 या 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील थरार संपलाय. आता प्लेऑफ फेरीला 23 मे पासून सुरुवात होत आहे. या प्लेऑफमधील पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएलमधील दुसरी यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात थेट फायनलसाठी लढत होणार आहे. या सामन्यात जिंकणारी टीम थेट फायनलला पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या टीमला आणखी एक संधी मिळेल. चेन्नईची धुरा अनुभवी महेंद्रसिंह धोनी याच्याकडे आहे. तर हार्दिक पंड्या गुजरातचं प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यानिमित्त आपण सविस्तर जाणून घेऊयात.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना कधी?

गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यात प्लेऑफमधील क्वालिफायर 1 सामना हा 23 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

गुजरात विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

जीटी विरुद्ध सीएसके या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

सामन्याला सुरुवात किती वाजता?

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

टीव्हीवर मॅच कुठे दिसणार?

गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

डिजीटल स्ट्रीमिंगचं काय?

गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील मॅच जिओ एपवर पाहता येईल.

गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रवि श्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.