RCB vs CSK Dhoni | महेंद्रसिंह धोनी खेळणार नाही? सीएसके टीमकडून मोठी अपडेट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आरसीबी विरुद्ध दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

बंगळुरु | आयपीएल 16 व्या मोसमातील 24 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरु इथे सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना आहे. आरसीबी आणि चेन्नई या दोन्ही संघांची या हंगामातील स्थिती सारखीच आहे. या दोन्ही टीमने खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. पॉइंट्सटेबलमध्ये चेन्नई सहाव्या आणि आरसीबी सातव्या क्रमांकावर आहेत. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी रॉयल चॅलेंज बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात दुखापीतमुळे खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. धोनीला बुधवारी 13 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्रास जाणवत होता. धोनीला धावताना त्रास होत होता. धोनीला सामन्यानंतर ड्रेसिंग रुमच्या दिशेने चालताना त्रास जाणवत होता. चेन्नईचा कोच स्टीफन फ्लेमिंग याने धोनीला दुखापत झाल्याचंही सांगितलं होतं. यामुळे आता धोनी आरसीबी विरुद्ध खेळणार की नाही, याकडे धोनी समर्थकांचं लक्ष असणार आहे.
धोनी रोहितसारखा गेम करणार?
दरम्यान दुसऱ्या बाजूला महेंद्रसिंह धोनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासारखा गेम करणार, असंही म्हटलं जात आहे. रोहित शर्मा रविवारी 16 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला नव्हता. रोहितचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. मात्र रोहित इमपॅक्ट प्लेअर म्हणून सहभागी झाला. त्याच प्रकारे धोनीही रोहितचीच निती वापरणार का, अशीही चर्चा आता रंगली आहे.
टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.
टीम आरसीबी | फॉफ डुप्लेसी (कर्णधार), विराट कोहली, हिमांशु शर्मा, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, फिन एलन, वानिंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर , मोहम्मद सिराज, जोश हेझलवुड, सिद्धार्थ कौल, रीस टॉपले, मनोज वानखेडे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, आकाश वशिष्ठ आणि आकाश दीप.
