AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 First Match : धोनी आणि हार्दिक यांच्यात रंगणार पहिला सामना, असे असतील 2 गट

IPL 2023 Schedule : आयपीएल २०२३ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. गुजरात आणि चेन्नई या दोन संघांमध्ये पहिला सामना रंगणार आहे.

IPL 2023 First Match : धोनी आणि हार्दिक यांच्यात रंगणार पहिला सामना, असे असतील 2 गट
IPL 2023 schedule
| Updated on: Feb 17, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलचा 16वा सीझन 31 मार्चपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. जगातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023 Timetable) 16 व्या हंगामाचा पहिला सामना गुजरात आणि चेन्नईमध्ये रंगणार आहे. IPL 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामाची घोषणा करण्यात आली. इंडियन प्रीमियर लीग 2023 31 मार्चपासून सुरू होत आहे. सीझनचा सलामीवीर एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स आमने-सामने असतील.

आयपीएल 16 मध्ये 70 लीग सामने खेळवले जातील

या हंगामात आयपीएलमध्ये 10 संघांमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील, ज्यामध्ये 18 डबल हेडरचा समावेश आहे. शेवटचा लीग टप्पा सामना 21 मे रोजी आहे, तर अंतिम सामना 28 मे रोजी होईल. IPL 2023 चे सामने अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला येथे  आयोजित करण्यात येणार आहेत.

आयपीएल 2023 मध्ये 10 संघ दोन गटात विभागले गेले आहेत. साखळी टप्प्यात सर्व संघांना 14-14 सामने खेळायचे आहेत. यावेळीही सर्व संघांना 7 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर आणि नंतर 7 सामने विरोधी कॅम्पच्या घरच्या मैदानावर खेळावे लागणार आहेत. दुपारचे सामने 3.30 वाजल्यापासून, तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजल्यापासून खेळवले जातील.

आगामी हंगामात लीग टप्प्यात दोन गट असतील.

गट अ:

लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स,

गट-ब:

चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.