AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शुभमन गिलने लूटली मैफील, रोहितने मिठ्ठी मारली तर हार्दिकने ठोकल्या टाळ्या

IPL 2023 : गुजरात टायटन्स संघाचा सलामीवर शुभमन गिलने याने मुंबई इंडियन्स विरुद्ध शतक ठोकत अहमदाबादच्या मैदानावर मैफील लुटली.

VIDEO: शुभमन गिलने लूटली मैफील, रोहितने मिठ्ठी मारली तर हार्दिकने ठोकल्या टाळ्या
| Updated on: May 26, 2023 | 10:24 PM
Share

IPL 2023 : आयपीएल 2023 चा दूसरा क्वालीफायर (IPL 2023 Qualifier 2) सामना आज अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. गुजरात टाइटन्स विरुद्ध मुंबई इंडियंस (GT vs MI) यांच्यात हा सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्स टॉस जिंकल्यानंतर आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल (Shubman Gill) याने जोरदार बॅटींग करत चांगली सुरुवात करुन दिली. आयपीएलच्या 16 व्या सीजनमध्ये त्याचे हे तिसरे शतक आहे. शतक ठोकताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने देखील त्याला मिठ्ठी मारली. तर गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने देखील टाळ्या वाजवत त्याचं कौतूक केलं.

शुभमनचं शानदार शतक

गुजरात टाइटन्सकडून खेळताना शुभमन गिल (Shubman Gill) याने 60 बॉलमध्ये 129 धावा ठोकल्या. त्याने 7 फोर आणि 10 सिक्स मारले. मुंबई विरुद्ध त्याचं हे दुसरं शतक होतं. त्याने 49 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण केल्यानंतर त्याने ते छान प्रकारे सेलिब्रेट देखील केलं. त्याने चाहत्यांना अभिवादन करत त्यांच्या शुभेच्छा ही स्वीकारल्या. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ही त्याला शाबासकी दिली.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

शुभमन गिलने लुटली मैफील

शुभमन गिलने या सीजनमध्ये त्याच्या बॅटने जोरदार फटकेबाजी केली. युवा खेळाडुच्या कामगिरीने अनेकांनी त्याचं कौतूक केलं. सचिन तेंडुलकरने देखील त्याच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली होती. त्याने 15 सामन्यात 800 हून अधिक धावा केल्या. ज्यामध्ये 3 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. महत्त्वाच्या सामन्यात त्याने संघासाठी महत्त्वाची कामगिरी केलीये. त्याच्या शतकीय खेळीमुळे गुजरात संघाने 233 धावांचं आव्हान मुंबई संघापुढे ठेवलं आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.