IPL 2023 : Hardik pandya साठी धोक्याची घंटा, तयार आहे त्याची परफेक्ट रिप्लेसमेंट

IPL 2023 : टीम इंडियाला हार्दिक पंड्याच्या तोडीचा दुसरा ऑलराऊंडर मिळू शकतो. काल आयपीएलच्या 9 व्या सामन्यात त्याची झलक दिसून आली. हार्दिक सारखीच त्याच्यामध्ये सुद्धा एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता आहे.

IPL 2023 : Hardik pandya साठी धोक्याची घंटा, तयार आहे त्याची परफेक्ट रिप्लेसमेंट
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 11:21 AM

KKR vs RCB IPL 2023 : टीम इंडियाकडे सध्याच्या घडीला हार्दिक पंड्या सर्वोत्तम ऑलराऊंडर आहे. हार्दिक पंड्याच्या तोडीचा दुसरा ऑलराऊंडर दिसत नव्हता. कुठल्याही टीममध्ये जास्त ऑलराऊंडर असतील, तर त्या टीमच्या विजयाची शक्यता अधिक असते. कारण बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये अनेक ऑप्शन्स निर्माण होतात. टीम इंडियाकडे आधीपासून दुसरा ऑलराऊंडर होता. पण त्याच्यामध्ये हार्दिकच्या तोडीची क्षमता दिसत नव्हती. पण आता या प्लेयरमध्ये ती धार दिसून आलीय. निश्चितच भारतीय क्रिकेटसाठी ही एक चांगली बाब आहे.

यातून टीम इंडियात एक सकारात्मक स्पर्धा वाढीस लागेल. हा खेळाडू टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांचा विश्वास जिंकत चाललाय. त्याच्यामध्ये एकट्याच्या बळावर प्रतिस्पर्धी टीमला उद्धवस्त करण्याची क्षमता दिसून आलीय.

वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल

टीम इंडियाचा हा खेळाडू वर्ष 2023 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल. टीम इंडियाच्या या खेळाडूच नाव आहे शार्दुल ठाकूर. काल शार्दुलने कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजांची वाट लावून टाकली. त्याने 29 चेंडूत 68 रन्स फटकावल्या.

ठाकूरने संपूर्ण मॅचच चित्र पालटून टाकलं

केकेआर टीमची एकवेळ 11.3 ओव्हर्समध्ये 89 धावांवर 5 विकेट अशी स्थिती होती. केकेआरचा डाव 120 धावांवर आटोपणार असं चित्र दिसत होतं. पण सातव्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने संपूर्ण मॅचच चित्र पालटून टाकलं. त्याच्या फलंदाजीच्या बळावर केकेआरने 204 धावांचा पल्ला गाठला.

मॅन ऑफ द मॅच पुरस्कार

शार्दुलच्या या इनिंगच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने RCB वर 81 धावांनी मोठा विजय मिळवला. शार्दुल ठाकूरला त्याच्या या इनिंगसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं.

शार्दुल ठाकूरने एकट्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. शार्दुलने त्याच्या छोट्या तुफानी इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 9 फोर मारले. शार्दुल ठाकूरने गोलंदाजी करताना 1 विकेट काढला. टीम इंडियाला आता शार्दुलच्या रुपाने हार्दिक पंड्याच्या तोडीचा दुसरा ऑलराऊंडर दिसू लागलाय. या बाबतीत तो हार्दिक पंड्यावर भारी पडतो

शार्दुल ठाकूर टेस्ट आणि वनडे टीममध्ये खेळतो. असाच खेळ त्याने सुरु ठेवला, तर तो टी 20 मध्येही दिसेल. हार्दिक पंड्या फक्त वनडे आणि टी 20 मध्ये खेळतो. टेस्टमध्ये खेळण्यासाठी हार्दिक पंड्याकडे आवश्यक फिटनेस नाहीय. शार्दुल ठाकूर या बाबतीत हार्दिक पंड्यावर भारी पडतो.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.