IPL 2024 : सूर्यकुमार यादव आयपीएल खेळणार की नाही? मोठी अपडेट समोर

Suryakumar Yadav Fitness Test | मुंबई इंडियन्सची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव याला झालेल्या दुखापतीने टीम इंडियानंतर आता पलटणचं टेन्शन वाढलं आहे. नक्की काय झालंय?

IPL 2024 : सूर्यकुमार यादव आयपीएल खेळणार की नाही? मोठी अपडेट समोर
| Updated on: Mar 21, 2024 | 8:40 PM

मुंबई | आयपीएलच्या 17 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने टेन्शन वाढवलं आहे. सूर्यकुमारच्या फिटनेस टेस्टचा निकाल समोर आला आहे. सूर्याच्या फिटनेस टेस्टच्या निकालामुळे मुंबई टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. नक्की काय झालंय? सूर्याच्या फिटनेस टेस्टचा काय निकाल लागला? याबाबत आपण जाणून घेऊयात.

सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट एकेडमीमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्सच्या एमआय फॅन्स आर्मी या एक्स हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता कायम आहे. तसेच सूर्या फिटनेस टेस्टमध्ये पास न होऊ शकल्याने त्याच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार कायम आहे.

सूर्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली होती. सूर्या दुखापतीमुळे अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता. सूर्यावर या दरम्यान शस्त्रक्रिया पार पडली. सूर्या दुखापतीतून सावरलाही. मात्र आता सूर्या अखेरच्या टप्प्यावर आहे. आपण खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहोत, हे सूर्याला एनसीएत सिद्ध करावं लागणार आहे. सूर्या 19 मार्च रोजी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला. त्यानंतर आता पुन्हा तसंच घडल्याचं समजतंय. त्यामुळे आता याबाबतच्या पुढील अपडेटकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

सूर्यकुमार यादव याच्याबाबत मोठी अपडेट

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, गेराल्ड कोएत्झी, क्वेना मफाका , नुमान थुसारा, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, रोमारियो शेफर्ड आणि नमन धीर.