IPL 2024 | हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सला सोडून पुन्हा मुंबईत इंडियन्समध्ये येणार?
Ipl Auction 2024 Hardik Pandya | मुंबई इंडियन्ससाठी 7 हंगाम खेळलेला आणि आता गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेला हार्दिक पंड्या याची घरवापसी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत ट्रॉफी जिंकली. चेन्नईने आयपीएल 2023 फायनलमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत केलं. त्यानंतर आता अनेक महिन्यांनी पुन्हा आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी ट्रान्सफर विंडो ओपन करण्यात आली आहे. या ट्रान्सफर विंडोमधून अनेक खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना अनेक आणि मोठे बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडियाचा टी 20 चा कॅप्टन हार्दिक पंड्या याला गुजरात टायटन्स ट्रेडिंगसाठी मुक्त करु शकते. त्यामुळे हार्दिक आता कोणत्या टीममध्ये सहभागी होणार,अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तसेच हार्दिक सोशल मीडियावर ट्रेडिंग टॉपिक ठरला आहे.
मुंबईत इंडियन्समध्ये हार्दिक स्वागत होणार?
Hardik Pandya has been released by Gujarat Titans, will play for Mumbai Indians.
Sounds like Sam Altman quitting the CEO role at OpenAI to join Microsoft. pic.twitter.com/MHWVTsaMPH
— Gabbar (@GabbbarSingh) November 24, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्या याची घरवापसी होऊ शकते. अर्थात हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतु शकतो. मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पुन्हा पलटणमध्ये येऊ शकतो. आता हार्दिक मुंबई टीममध्ये येणार की आणखी कोणत्या टीममध्ये जाणार हे येत्या 48 तासांमध्ये स्पष्ट होईल. कारण ट्रेडिंग विंडोसाठी 26 नोव्हेंबर अखेरची मुदत आहे. हार्दिक मुंबई इंडियन्ससाठी 7 हंगाम खेळला आहेत. तर पलटणने हार्दिकला 2022 मध्ये करारमुक्त केलं होतं.
