CSK vs LSG : चेन्नई विरुद्धच्या विजयाचं श्रेय कोणाला? लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील सर्वात कठीण विजय लखनौ सुपर जायंट्सने मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर विजयासाठी 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पहिली 10 षटकातील खेळ पाहता अशक्य होतं. पण नंतर सामन्याची बाजू फिरली आणि पूर्णपणे लखनौच्या पारड्यात झुकला. सामन्यानंतर कर्णधार केएल राहुलने आपलं मत मांडलं.

CSK vs LSG :  चेन्नई विरुद्धच्या विजयाचं श्रेय कोणाला? लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 12:42 AM

आयपीएल स्पर्धेत 200 पार धावसंख्या गाठणं तसं काही सोपं नसतं. त्यात समोर चेन्नई सुपर किंग्ससारखा तगडा संघ असताना तर जवळपास अशक्यप्राय असतं. पण लखनौ सुपर जायंट्सने ही किमया साधली आहे. चेन्नईचं होमग्राउंड असलेल्या चेपॉकवर सुपर किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या होत्या. विजयासाठी दिलेल्या 211 धावा लखनौ सुपर जायंटने 19.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केल्या. चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयात मार्कस स्टोयनिसची नाबाद 124 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. शेवटपर्यंत उभा राहून त्याने हा सामना जिंकून दिला. या विजयामुळे लखनौ सुपर जायंट्सने टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. या सामन्यातील विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल खूश दिसला. सामन्यानंतर त्याने या विजयाचं विश्लेषण केलं.

“हा सामना खरंच खूप खास होता. आम्ही फलंदाजी करत असताना हा सामना खूपच मागे पडला होता. त्यामुळे हातून निसटलेला सामन्यात विजय मिळवणं खरंच खास असतं. त्यांनी आमच्यावर दबाव आणला होता. येथे खरंतर 170-180 ही धावसंख्या मोठी ठरली असती. पण या विजयाचं सर्व श्रेय हे मार्कस स्टोयनिसला..कारण नुसतं पॉवर हिटिंग नव्हती तर प्रत्येक चाल डोक्याने खेळत होता. त्याने गोलंदाजाची निवड करून फटकेबाजी केली.” असं लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने सामन्यानंतर सांगितलं.

“स्टोयनिसला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून पॉवरप्लेचा फायदा घेण्याचा हेतू होता. कारण टॉप 3 मध्ये एक पॉवर हिटर असायला हवा. गेल्या काही वर्षात टी20 क्रिकेट बदललं आहे. तुम्हाला पॉवर प्लेमध्ये चांगली खेळी करणं आवश्यक असतं. त्यात इम्पॅक्ट प्लेयरमुळे या खेळाला अधिक खोली आली आहे.”, असं केएल राहुलने सामन्यानंतर सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.