AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, पंटरला हटवल्यामुळे ऋषभ पंतही सोडणार दिल्लीची साथ?

वर्ल्ड कपनंतर सीरीजची गडबड सुरू असताना क्रिकेटमधून आणखी एक मोठी बातमी समोर आलीये. पंटरला राजीनामा दिला लावल्याने आता कॅप्टन ऋषभ पंतही दिल्ली कॅपिटल्स सोडणार असल्याचं बोललं जत आहे.

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, पंटरला हटवल्यामुळे ऋषभ पंतही सोडणार दिल्लीची साथ?
| Updated on: Jul 15, 2024 | 7:18 PM
Share

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता आगामी सीरीजसाठी टीम इंडियाच्या संघ बांधणीची तयारी सुरू झाली आहे. गौतम गंभीरकडे आता मुख्य प्रशिक्षकपदाची सोपवण्यात आलीये. टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शनिवारी क्रिकेट वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून रिकी पॉन्टिंग यांची उचलबांगडी झालीये. पुढील वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव पारड पडला जाणार असल्याने सर्व टीम मोठे निर्णय घेताना दिसत आहे. मात्र पॉन्टिंगला हटवल्याने कॅप्टन ऋषभ पंतही दिल्लीला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

मागील वर्षी रोहित शर्मा याची कॅप्टन्सी काढल्यावर मोठा राडा झाला होता. हार्दिक पंड्या याला कॅप्टन म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर चाहत्यांंनी त्याची माफी मागितली होती. मात्र आता ऋषभ पंत दिल्ली सोडणार असल्याच्या चर्चांंणी जोर पकडला आहे. पंटरला काढल्यामुळे पंत नाराज असून तोही दिल्ली सोडणार असल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.

येत्या मेगा आयपीएल लिलावाआधी ऋषभ पंत हा दिल्ली सोडेल असं बोललं जात आहे. एका नेटकऱ्याने तर पंत हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल असं म्हटलं आहे. कारण सीएसकेच्या टीमला एका कॅप्टनची गरज आहे. सोशल मीडियावर अशी कितीही चर्चा सुरू असली तरीसुद्धा अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं याकडे लक्ष लागून असणार आहे.  ऋभप पंत याचा अपघात झाल्यानंतर त्याने जोरदार कमबॅक केलं. गडी आला आणि आयपीएलही खेळला इतकंच नाहीतर वर्ल्ड कपसाठीही त्याची निवड झाली. वर्ल्ड कपमधील अमिरेकेत झालेल्या सामन्यांमध्ये त्याने दमदार प्रदर्शन करत सर्वांनी मने जिंकली होतीत.

रिकी पॉन्टिंग 2018 पासून दिल्ली संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहत होता. सात वर्षांमध्ये तीनवेळा दिल्लीने प्लेऑफ गाठली तर एकदा फायनलमध्ये धडक मारली होती. पण एकदाही चॅम्पियन होता आलं नाही. आता भारताचा माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली कर्णधारपदाची धुरा आपल्या हाती घेणार आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....