IPL 2024 GT vs DC Live Streaming : गुजरात विरुद्ध दिल्ली कडवी झुंज, कोण होणार विजयी?
Gujarat Titans vs Delhi Capitals Live Streaming : शुबमन गिल विरुद्ध ऋषभ पंत हे दोन युवा कर्णधार 32 व्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत.

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. दोन्ही संघांनी आपला गेला सामना जिंकला आहे. तसेच आता प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी प्रत्येक सामना हा निर्णायक आणि महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चांगलीच रंगत आणि चढाओढ पाहायला मिळू शकते. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना केव्हा?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना कुठे?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरु होणार?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना हा संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?
गुजरात विरुद्ध दिल्ली सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपच्या मदतीने फुकटात पाहता येईल.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शना लिटल, एन. , नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर
दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झाये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण यादव. दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.
