AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं! हार्दिक पुढचा कॅप्टन

Mumbai Indian Hardik Pandya | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार बदलण्यात आला आहे. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

IPL 2024 | मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं! हार्दिक पुढचा कॅप्टन
| Updated on: Dec 15, 2023 | 7:07 PM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमाकडे लागलं आहे. या 17 व्या मोसमाआधी येत्या 19 डिसेंबरला मंगळवारी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे दुबईत करण्यात आलं आहे. या ऑक्शनमध्ये 77 जागांसाठी 333 खेळाडू मैदानात आहेत. ऑक्शनआधी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने कॅप्टन बदलला. श्रेयस अय्यर याच्याकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नितीश राणा याला उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने कॅप्टन बदलला आहे. कर्णधारपदावरुन रोहित शर्मा याची उचलबांगडी केली आहे. रोहित शर्मा 2013 पासून मुंबईचं नेतृत्व करत होता. तर आता हार्दिक पंड्या याला कर्णधार करण्यात आलं आहे. हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्समध्ये गुजरात टायटन्स टीमधून ट्रेड करुन घेतलं होतं. त्याआधी हार्दिक 2015 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्सकडूनच खेळायचा.  आता येत्या 17 व्या मोसमात आता हार्दिक पंड्या याच्याकडे आपल्या कॅप्टन्सीत मुंबईला सहाव्यांदा चॅम्पियन करण्याची जबाबदारी असणार आहे.

हार्दिकने आपल्या नेतृत्वात पदार्पणातीलच हंगामात गुजरात टायटन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची कामगिरी केली. हार्दिकने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन केलं होतं. मुंबईने हार्दिकला 2022 च्या लिलावाआधी करारमुक्त केलं होतं. मात्र आता पुन्हा हार्दिक मुंबईत आलाय आणि थेट कॅप्टन झालाय.

गुजरातच्या हार्दिक पंड्याकडे मुंबईचं नेतृत्व

आयपीएलमधील यशस्वी कर्णधार

रोहित शर्माने 2013 पासून ते 2023 या कालावधीदरम्यान मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सांभाळलं. रोहितने या दरम्यान मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात ट्रॉफी जिंकून दिली. तसेच मुंबई गेल्या हंगामात प्लेऑफपर्यंत पोहचली. मात्र मुंबई त्यापुढे जाण्यात अपयशी ठरली.

रोहितची आयपीएल कारकीर्द

दरम्यान रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 243 सामने खेळले आहेत. या 243 सामन्यांमध्ये रोहितने 130.05 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 42 अर्धशतकांच्या मदतीने 6 हजार 211 धावा केल्या आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.