AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझी टिंगल करत होते, पण…”, मिचेल स्टार्कने सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर सर्वकाही सांगितलं

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट राखून लोळवलं. या विजयासह जेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं आहे. कोलकाता सर्वाधिक जेतेपद जिंकणाऱ्या संघांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अंतिम सामन्यात मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली आणि हैदराबादचं कंबरडं मोडलं. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

माझी टिंगल करत होते, पण..., मिचेल स्टार्कने सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर सर्वकाही सांगितलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 27, 2024 | 12:29 AM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं. साखळी फेरीतही अव्वल स्थानी राहिली आणि प्लेऑफमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली. खासकरून प्लेऑफच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा हुकमी एक्का चालला. खऱ्या अर्थाना कोलकाता नाईट रायडर्सचे 24.75 कोटी रुपये वसूल झाले असं म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कसाठी सर्वाधिक रक्कम मोजली गेली. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात त्याच्यासाठी चढाओढ लागली होती. पण गौतम गंभीर मागे हटत नसल्याचं पाहून आशिष नेहराने काढता पाय घेतला. मिचेल स्टार्कसाठी आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मिचेल स्टार्कने मोडीत काढले होते. पण साखळी फेरीत मिचेल स्टार्ककडून हवी तशी कामगिरी झाली नाही. पहिल्याच सामन्यात चार षटकांचा महागडा स्पेल टाकला. तसेच विकेट घेण्यात अपयशी ठरला. पण मिचेल स्टार्क हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. कोलकात्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आणि मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीला धार चढली. अंतिम फेरीतील स्पेलनंतर मिचेल स्टार्कने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

“कोलकात्यासाठी आजची खूप छान आहे. दोन तगड्या टीम अंतिम फेरीत होत्या. आमच्या संघातील गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही बाजू भक्कम होत्या. प्रत्येक खेळाडूंनी आपली भूमिका चोखपणे बजावली. आम्ही नाणेफेक हरलो आणि प्रथम गोलंदाजी आली. श्रेयसने खरंच खूप छान कर्णधारपद भूषवलं. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण योग्य पद्धतीने लावलं. याचं क्रेडीट पूर्णपणे त्याला जातं.”, असं मिचेल स्टार्क म्हणाला. “माझ्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले हे अनेकजण हसण्यावर नेत होते. टिंगलही झाली. मी बऱ्याच वर्षांपूर्वी आयपीएल खेळलो होतो. मला अनुभव होता आणि त्या अनुभवाचा मला फायदा झाला. मला आनंद आहे की अनुभवी वयस्कर आहे.”, असंही स्टार्कने पुढे सांगितलं.

मिचेल स्टार्कने क्वॉलिफायर 1 आणि अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं. क्वॉलिफायर 1 मधील त्याचा स्पेल पाहून ट्रेव्हिस हेड त्याला पहिल्या षटकात सामोरा गेला नाही. पण मिचेल स्टार्कने त्याची भूमिका चोख बजावली. अभिषेक शर्माला बाद करत चांगली सुरुवात करून दिली. त्या विकेटनंतर हैदराबाद डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही. मिचेल स्टार्कने 3 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले. पण हे दोन्ही गडी खूपच महत्त्वाचे होते.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी