IPL 2024, MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सला दणका, सामना फक्त 9 धावांनी टाकला खिशात

आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं आहे. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 गडी गमवून 192 धावा केल्या. मात्र हे आव्हान पंजाब किंग्सला काही गाठता आलं नाही. आशुतोष शर्माची वादळी खेळीने मात्र मुंबई इंडियन्सची धाकधूक वाढवली होती.

IPL 2024, MI vs PBKS : मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सला दणका, सामना फक्त 9 धावांनी टाकला खिशात
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 11:49 PM

आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी सुरुवातीला अक्षरश: माती केली. मुंबई इंडियन्सला तावडीत पकडण्याची चांगली संधी होती. पण मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचं गाठताना पडझड झाली. एकेरी धावसंख्येवर 4 गडी तंबूत परतले. सॅम करन 6, प्रभसिमरन 0, रिली रोस्सो 1, लियाम लिविंगस्टोन 1 आणि हरप्रीत सिंग भाटिया 13 धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाळ आणि आकाश मढवालने एकापाठोपाठ एक करत फलंदाजांना तंबूत पाठवलं. पण आशुतोष शर्माचं नावाचं वादळ मैदानात होतं तिथपर्यंत मुंबई इंडियन्सला विजयाची चव काही चाखता येत नव्हती. अखेर कोएत्झीच्या गोलंदाजीवर आशुतोष शर्मा 61 धावा करून बाद झाला आणि सामना मुंबईच्या पारड्यात झुकला. हरप्रीत ब्रार आणि त्यानंतर कगिसो रबाडाने षटकार मारत सामन्यात रंगत आणली. मात्र शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेण्याचा नादात धावचीत झाला आणि सामना मुंबई इंडियन्सने जिंकला.

पंजाब किंग्सकडून शशांक सिंग, आशुतोश शर्मा आणि हरप्रीत ब्रार यांनी जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे कधी सामना पंजाबच्या बाजूने, तर कधी मुंबईच्या बाजूने झुकलेला दिसला. जितेश शर्माची विकेट 77 धावांवर पडली होती. त्यानंतर शशांक आणि आशुतोषने 34 धावांची भागीदारी केली. मात्र सामन्यात खरी रंगत आणली ती आशुतोष शर्मा आणि हरप्रीत ब्रारच्या भागीदारीनी..या दोघांनी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तसेच धावा आणि चेंडूतलं अंतरही कमी केलं होतं. त्यामुळे हा सामना पूर्णपणे पंजाबच्या बाजूने झुकला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि आशुतोषची विकेट पडली आणि मुंबईने सामन्यावर पकड मिळवली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.