AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 MI vs RCB Live Streaming : मुंबई विरुद्ध बंगळुरु वानखेडेत भिडणार, कोण ठरणार सरस?

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : 1 सामन्याचा फरक सोडला तर मुंबई आणि आरसबीची स्थिती जवळपास सारखीच आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस असणार आहे.

IPL 2024 MI vs RCB Live Streaming : मुंबई विरुद्ध बंगळुरु वानखेडेत भिडणार, कोण ठरणार सरस?
mi vs rcb ipl,Image Credit source: BCCI/IPL
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 10, 2024 | 3:47 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना होणार आहे. हार्दिक पंडया याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स खेळणार आहे. तर फाफ डु प्लेसीस आरसीबीचं कर्णधारपद सांभाळणार आहे. मुंबईचा हा चौथा आणि बंगळुरुचा सहावा सामना असणार आहे. मुंबईने 4 पैकी 1 सामना जिंकलाय. तर बंगळुरुने 5 पैकी 1 वेळा विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजय मिळवून ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली असाही हा सामना असणार आहे. या सामन्याबाबत आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना केव्हा?

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना गुरुवारी 11 एप्रिल रोजी होणार आहे.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

मुंबई विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येईल.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), यश दयाल, विजयकुमार वैशाख, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरुन ग्रीन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, सौरव चौहान आणि अनुज रावत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...