MI vs RR : होमग्राउंडवर राजस्थान मुंबईवर पडली भारी, रॉयल्सला विजयासाठी दिल्या 126 धावा
आयपीएल 2024 स्पर्धेतील 14वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला आणि मुंबईला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली.

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कस लागणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने स्पर्धेत दोन सामने गमवले आहेत. आता राजस्थान विरुद्धच्या सामन्यात परिस्थिती एकदम वाईट आहे. मुंबई इंडियन्सने 9 गडी गमवून 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान दिलं. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. वानखेडेवर खऱ्या अर्थाने प्रथम फलंदाजी करताना मोठ्या धावसंख्येची आवश्यकता असते. मात्र मुंबईने राजस्थानसमोर अक्षरश: नांगी टाकली. सुरुवातीच्या तीन फलंदांना आपलं खातंही खोलता आलं नाही. अवघ्या 14 धावांवर तीन गडी तंबूत परतले होते. विशेष म्हणजे या तिघांना आपलं खातं खोलता आलं नाही.
रोहित शर्माच्या रुपाने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. ट्रेंट बोल्टने त्याला शून्यावरच तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेल्या नमन धीरला आपलं खातंही खोलता आलं नाही. बोल्टने त्याला पायचीत केलं. त्यानंतर संघाचा 14 धावा होईपर्यंत इशान किशनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र डेवॉल्ड ब्रेविस स्ट्राईकला येताच बोल्टने त्याची बोलती बंद केली. तसेच शून्यावर बाद होणार तिसरा खेळाडू ठरला. तिलक वर्मा आणि इशानकडून अपेक्षा होत्या. मात्र इशान किशन 16 धावांवर बाद झाला.
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पाचव्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. मात्र आक्रमक खेळी करताना हार्दिक पांड्या विकेट देऊन बसला. 34 धावांवर असताना चहलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारला आणि रोवमन पॉवेलने त्याचा झेल पकडला. त्यानंतर पियुष चावला आला आणि अवघ्या 3धावांवर तंबूत परतला. तिलक वर्माकडून अपेक्षा होत्या. मात्र त्याचा डावही 32 धावांवर आटोपला. गेराल्ड कोएत्झी 4 धावांवर बाद झाला. टिम डेविडही फक्त 17 धावा करू शकला. ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. नांद्रे बर्गरने 2 आणि आवेश खानने 1 गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल
